Wednesday, May 14, 2025

मनोरंजनताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Sikandar Teaser Date : सलमान खानच्या 'सिकंदर'चा टीझर पाहण्यासाठी चाहत्यांना पहावी लागणार आणखी एक दिवस वाट!

Sikandar Teaser Date : सलमान खानच्या 'सिकंदर'चा टीझर पाहण्यासाठी चाहत्यांना पहावी लागणार आणखी एक दिवस वाट!

मुंबई : सलमान खानचा (Salman Khan) आज २७ डिसेंबर रोजी  ५९ वा वाढदिवस आहे. सलमानच्या वाढदिवसानिमित्त त्याचे जगभरातील करोडो चाहते त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. अशातच सलमान खानच्या आगामी 'सिकंदर' सिनेमाचा टीझर आज त्याच्या वाढदिवशी रिलीज होणार होता. पण काल भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग (Dr. Manmohan Singh) यांचं निधन झाल्याने टीझर रिलीजबाबत निर्मात्यांनी मोठा निर्णय घेतला आहे.



सलमान खानच्या वाढदिवसानिमित्त म्हणजेच आज सलमानचा आगामी 'सिकंदर' सिनेमाचा टीझर रिलीज होणार होता. परंतु काल डॉ.मनमोहन सिंग यांचं निधन झाल्याने निर्मात्यांनी टीझर रिलीजची डेट पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. आज ११ वाजता रिलीज होणारा 'सिकंदर'चा टीझर आता उद्या सकाळी ११ वाजून ७ मिनिटांनी रिलीज होणार आहे. त्यामुळे सलमानच्या चाहत्यांना आणखी काही तास 'सिकंदर'चा टीझरसाठी वाट पाहावी लागणार आहे.

सलमान खानचा बहुप्रतिक्षित ‘सिकंदर’ सिनेमा पुढील वर्षी ईदच्या मुहुर्तावर रिलीज होणार आहे.या सिनेमाचे दिग्दर्शन 'गजनी' फेम ए.आर. मुरुगदास यांनी केली आहे.तर या सिनेमाची निर्मिती साजिद नाडियादवाला यांनी केली आहे. 'किक'नंतर अनेक वर्षांनी सलमान आणि साजिद एकत्र काम करत आहेत. यावेळी त्याच्यासोबत दक्षिणेतील प्रसिद्ध दिग्दर्शकच नाही तर पुष्पाची अभिनेत्री रश्मिका मंदान्नाही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. पहिल्यांदाच त्यांची जोडी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सलमानचे चाहते सिनेमासाठी प्रचंड उत्सुक आहेत.

Comments
Add Comment