Sunday, March 23, 2025
Homeताज्या घडामोडीPM Narendra Modi : आर्थिक संकटातून देशाला बाहेर काढणाऱ्या नेत्याचे कार्य नेहमी...

PM Narendra Modi : आर्थिक संकटातून देशाला बाहेर काढणाऱ्या नेत्याचे कार्य नेहमी लक्षात राहील!

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला शोक

नवी दिल्ली : भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग (Dr. Manmohan Singh) यांचे काल रात्री दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात निधन झाले. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला असून त्यांच्या निधनाबद्दल जगभरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. अशातच आज सकाळपासून दिग्गज नेत्यांकडून श्रध्दांजली वाहिली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देखील माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना श्रध्दांजली अर्पण केली असून शोक व्यक्त केला आहे.

Dr. Manmohan Singh : देशाने एक उमदा प्रशासक, अर्थतज्ञ गमावला – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘देशातील प्रतिष्ठित नेत्यांपैकी एक असलेल्या डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल भारत शोक व्यक्त करतो आहे. सामान्य पार्श्वभूमी असलेले डॉ. मनमोहन सिंग एक विख्यात अर्थतज्ज्ञ बनले. त्यांनी अर्थमंत्री आणि इतरही अनेक पदांवर काम करत अनेक वर्ष आपल्या आर्थिक धोरणांवर छाप सोडली. संसदेत त्यांनी मांडलेले मुद्देही व्यावहारिक असत. पंतप्रधान म्हणून काम करत असताना त्यांनी जनतेचे जीवन सुखकर करण्यासाठी अथक प्रयत्न केले,’ असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

त्याचबरोबर ‘मी गुजरातचा मुख्यमंत्री असताना आमच्यात नेहमी सुसंवाद होत असे. शासनाशी संबंधित अनेक विषयांवर आम्ही चर्चा करत असू. यावेळी त्यांची बुद्धिमत्ता आणि विनम्रता पाहायला मिळायची. या दुःखद प्रसंगी मी डॉ. मनमोहन सिंग यांचे कुटुंबिय, मित्र आणि हितचिंतकांच्या प्रती संवेदना व्यक्त करतो’ अशा भावना नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्या आहेत.

अर्थव्यवस्थेला स्थैर्य देण्यासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले

डॉ. मनमोहन सिंग यांची ओळख १९९१च्या आर्थिक संकटाच्या काळात भारताला दिलेल्या दिशादर्शनासाठी आहे. त्यांनी आपल्या कार्यकाळात आर्थिक धोरणांत क्रांतिकारी बदल घडवून आणले. त्यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला स्थैर्य देण्यासाठी मोठे प्रयत्न केले. ते संकटाच्या काळातही देशहितासाठी कायम कार्यरत राहिले’, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -