
मुंबई : गेले काही दिवस महाराष्ट्रात थंडी जाणवतेय. पाण्यात हात जरी घातला तरी एकदम थंडगार पाणी हाताला लागतंय. हिवाळ्यात आरोग्याच्या समस्या आणि त्वचे संबंधित समस्या निर्माण होत असतात. हिवाळ्यात शरीराची आणि त्वचेची काळजी घेणे अत्यंत आवश्यक असते. या दिवसातआरोग्याच्या तक्रारीसह आणखी एक तक्रार जास्त जाणवते ती म्हणजे वारंवार सू सू होते किंवा एसीमध्ये बसल्यावर हा त्रास सूरू होतो. काहींना एसीमध्ये लागवीचा प्रॉब्लेम असतोच. पण हिवाळ्यात सू सू ला पुन्हा पुन्हा जाण्याची समस्या जास्तच जाणवते. पण, याच दिवसात का वारंवार सू सू का होते? यामागची कारण काय असतील? तुम्हीही या समस्येने त्रस्त असाल तर जाणून घ्या,याची कारणे आणि टीप ज्यामुळे तुमची ही समस्या कमी होईल.

मुंबई : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षांचं स्वागत करण्यासाठी २५ डिसेंबर ख्रिसमसपासूनच अनेक लोकं सुट्टीवर गेले आहेत. या दिवसांमध्ये ...
वारंवार सू सू का होते?
मानवाच्या शरीराचे तापमान ३७ अंश सेल्सिअसच्या आसपास असावे लागते. पण, या दिवसात जेव्हा थंडी जास्त वाढते तेव्हा हे तापमान राखण्यासाठी रक्ताभिसरण अधिक प्रमाणात होणे आवश्यक असते. हिवाळ्यात सामान्य पाणी पिण्यापेक्षा तुम्ही थोडे पाणी कोमट करून पिऊ शकतात. याशिवाय शरीर उबदार ठेवण्यासाठी विशेषतः कान झाकून ठेवा. चहा आणि कॉफी सारख्या कॅफिन युक्त पदार्थांचा वापर कमी प्रमाणात करा. याशिवाय रात्री गरम दुधासोबत हळद, केशर, दालचिनी आणि अंजीर चे सेवन करा. तुमची खोली आणि घर शक्य होईल तितके उबदार ठेवण्याचा प्रयत्न करा.यासाठी हृदय खूप जलद गतीने आणि वारंवार पंप होत असते. या सर्व गोष्टींसह तुम्ही तुमच्या शरीराचे तापमान नियंत्रित करू शकता. ज्यामुळे वारंवार बाथरूमला जाण्याच्या समस्येपासून तुम्हाला आराम मिळू शकेल.
यावरील टिप्स –
१) थंडीच्या दिवसात तुम्ही थोडं पाणी कोमट करून प्यायला हवे. २) शरीर गरम राहण्यासाठी कान झालुं झोपावे. ३) चहा, कॉफी कमी प्रमाणात प्यावे. ४) घरातील खोल्या उबदार ठेवाव्या. ५) रात्री झोपण्यापूर्वी गरम हळदी, केशर, दालचिनी आणि अंजीर दुध प्यावे. ६) शरीर उबदार ठेवण्यासाठी तुम्ही सूपसुद्धा पिऊ शकता. ७) जास्तच थंडी जाणवत असल्यास स्वेटर परिधान करून झोपावे.