Saturday, March 22, 2025
Homeक्राईमTuljapur News : बीड प्रकरणाची पुनरावृत्ती! तुळजापूरच्या सरपंचावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा...

Tuljapur News : बीड प्रकरणाची पुनरावृत्ती! तुळजापूरच्या सरपंचावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न

तुळजापूर : काही दिवसांपूर्वी बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरणामुळे राज्यभरात एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर काल रायगड जिल्ह्यामध्ये अशीच घटना घडल्याचे समोर आले होते. तर आता तुळजापूरमध्ये बीड प्रकरणाची पुनरावृत्ती झाल्याचे उघडकीस आले आहे. तुळजापूर तालुक्यातील सरपंचाला गावगुंडांकडून थेट जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे राज्यात कायदा-सुव्यवस्थेबाबत प्रश्न ऐरवणीवर आला आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध हाताला काळी पट्टी बांधून का उतरली टीम इंडिया? जाणून घ्या कारण

तुळजापूर तालुक्यातील मेसाई जवळगा गावच्या सरपंचावर हल्ला करुन जीवे मारण्याचा प्रयत्न झाला आहे. मध्यरात्री एकच्या सुमारास बारुळ गावाजवळ ही घटना घडली. मेसाई जवळगा गावचे सरपंच नामदेव निकम त्यांच्या भावासह मध्यरात्री गाडीने प्रवास करत असताना त्यांच्या गाडीवर हल्ला झाला. गाडीच्या समोरच्या काचेवर अंडी फेकून, दगडांनी काचा फोडून तसेच गाडीत पेट्रोल टाकून गाडी पेटवण्याचा प्रयत्न केला गेला. या हल्ल्यामध्ये सरपंच नामदेव निकम थोडक्यात बचावले आहेत.

दरम्यान, पवनचक्कीच्या वादातून हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. तसेच याप्रकरणी पोलिस कारवाई करत असून गुन्हेगारांना बेड्या कधी ठोकणार याकडे सर्व तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -