मुंबई : प्रवाशांच्या सोयीसाठी, पश्चिम रेल्वे (Western railway) नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला ८ विशेष उपनगरीय सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
डाउन: नवीन वर्षाची पूर्वसंध्येला विशेष ट्रेन चर्चगेट येथून ३१ डिसेंबर २०२४ /०१ जानेवारी २०२५ रोजी मध्यरात्री ०१.१५ वाजता सुटेल आणि विरारला पहाटे ०२.५५ वाजता पोहोचेल.
नवीन वर्षाची पूर्वसंध्या विशेष ट्रेन चर्चगेट येथून ३१ डिसेंबर २०२४/ १ जानेवारी २०२५ रोजी मध्यरात्री ०२.०० वाजता सुटेल आणि विरारला पहाटे ०३.४०वाजता पोहोचेल. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला विशेष ट्रेन ३१ डिसेंबर २०२४ / ०१ जानेवारी २०२५ रोजी चर्चगेटला पहाटे ०२.३० वाजता सुटेल आणि ०४.१० वाजता विरारला पोहोचेल.
अमरावतीची करीना थापा आणि मुंबईच्या केया हटकरला ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला विशेष ट्रेन चर्चगेट येथून मंगळवार आणि बुधवारी मध्यरात्री ०३.२५वाजता सुटेल आणि विरारला ०५.०५ वाजता पोहोचेल.
अप: नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला विशेष ट्रेन मंगळवारी आणि बुधवारी मध्यरात्री ००.१५ वाजता विरारहून निघेल आणि चर्चगेटला ०१.५२ वाजता पोहोचेल.
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला (Western railway) विशेष ट्रेन मंगळवार, बुधवारी मध्यरात्री ००.४५ वाजता विरारहून निघेल आणि चर्चगेटला ०२.२२ वाजता पोहोचेल. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला विशेष ट्रेन मंगळवार, बुधवारी मध्यरात्री ०१.४० वाजता विरारहून निघेल आणि चर्चगेटला ०३.१७ वाजता पोहोचेल. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला विशेष ट्रेन मंगळवार, बुधवारी मध्यरात्री ०३.०५ वाजता विरारहून निघेल आणि चर्चगेटला ०४.४१ वाजता पोहोचेल. या सर्व विशेष गाड्या सर्व स्थानकांवर थांबतील.