नाशिक : नाशिकमधील (Nashik) त्र्यंबकेश्वर मंदिरात (Trimbakeshwar Temple) भाविकांची नेहमीच मोठी गर्दी असते. अशातच सध्या नाताळची सुट्टी सुरु असून अनेकजण विविध पर्यटनस्थळांसह देवदर्शनासाठी जातात. त्यामुळे त्र्यंबकेश्वर मंदिरात दिवसागणिक भाविकांची संख्या वाढत चालली आहे. भाविकांची मोठी गर्दी पाहता अनेकजण व्हीआयपी दर्शनाला पसंती देत आहेत. मात्र यामुळे इतर रांगेतील भाविकांची होणारी गैरसोय पाहता मंदिर प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
Marathi language : मराठी पाऊल पडते पुढे? मराठवाड्यातील विद्यार्थ्यांची मराठी कच्चे!
नाताळ सुट्ट्यांमुळे होणारी गर्दी लक्षात घेता नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिर प्रशासनाने पुढील काही दिवस त्र्यंबकेश्वर मंदिरातील व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. राज शिष्टाचार संबधी अतिमहत्त्वाचे व्यक्ती वगळता इतर भाविकांसाठी येत्या ५ जानेवरी २०२५ पर्यंत व्हीआयपी दर्शन सेवा बंद असणार आहे.