Sunday, August 3, 2025

Traffic jams : वाहतूक कोंडीने पुणे शहराचे रस्ते जाम

Traffic jams : वाहतूक कोंडीने पुणे शहराचे रस्ते जाम

पुणे : नाताळाचा उत्सव साजरा करण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात बाहेर पडल्याने शहराच्या मध्यभागासह कॅम्प परिसरात बुधवारी रात्री मोठी वाहतूक कोंडी (Traffic jams) झाली होती.गर्दीचा परिमाण म्हणून लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, बाजीराव रस्ता, टिळक रस्ता, नदीपात्रातील रस्ता, जंगली महाराज रस्ता, गणेशखिंड रस्ता या मार्गांवर मोठ्या प्रमाणात कोंडी झाली आहे. तर कॅम्पमध्ये महात्मा गांधी रस्ता आणि परिसरात असलेले अंतर्गत रस्ते देखील जाम झाले होते. कोंडी सुरळीत करण्यासाठी कॅम्प परिसरात चौकाचौकात वाहतूक पोलिस तैनात करण्यात आले होते. मात्र शहराच्या मध्य भागात वाहतूक पोलिसांची संख्या कमी होती. त्यामुळे मध्यभागातून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना इच्छित स्थळी जाण्यासाठी कोंडीचा सामना करावा लागला.



वारजे हायवे चौक ते शिवणे या रस्त्यावर वाहतूक कोंडी दोन्ही बाजूला ठिकठिकाणी असलेली रस्त्यालगत अतिक्रमणे, भाजीविक्रेते, रस्त्यावर उभी केलेली वाहने, ठिकठिकाणी असल्याच्या खाऊ गल्ली, चौपाटी, गणपती माथा येथील बस थांबा, एनडीए च्या रस्त्यालगत असलेल्या भाजी मंडई, शिंदे पुल येथील अरुंद चौक, नवभारत चौक परिसरातील रस्त्यालगतची अतिक्रमणे, नांदेड करून येणारी वाहने यामुळे होणारी वाहतूक कोंडी, देशमुख वाडी परिसरातील खाऊ गल्ली, वाहने रस्त्यावरच पार्किंग केली जातात. यामुळे वाहतूक कोंडी वाढत गेली.


नाताळ साजरे करण्यासाठी बुधवारी रात्री दहानंतर अनेक नागरिक घराबाहेर पडले होते. त्यामुळे शहरातील अनेक मार्गावर अचानक कोंडी झाली होती. यामध्ये शहराच्या मध्यभागातून कॅम्पकडे जाणाऱ्यांची संख्या सर्वाधिक होती. लेनची शिस्त न पाळणे, एकेरी मार्गावर उलट्या दिशेने वाहन नेणे, सिग्नल न पाळणे, दुतर्फा अशा प्रकारच्या वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याने कोंडीत भर पडत होती.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा