नवी दिल्ली : वीर बालदिनाचे औचित्य साधून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते १७ मुलांचा राष्ट्रीय बाल पुरस्काराने गौरव करण्यात आला. सात वेगवेगळ्या प्रकारातील प्रेरणादायी कार्यासाठी मुलांना गौरविण्यात आले. यंदाच्या विजेत्यांमध्ये चौदा राज्यांतील दहा मुली आणि सात मुलगे यांचा समावेश आहे.
President Droupadi Murmu conferred the Pradhan Mantri Rashtriya Bal Puraskar on 17 children for their exceptional achievements at a ceremony held at Rashtrapati Bhavan Cultural Centre. The President said that examples of patriotism among award-winning children reinforce our faith… pic.twitter.com/BD94KqE3b0
— President of India (@rashtrapatibhvn) December 26, 2024
राष्ट्रपती भवनातील सांस्कृतिक केंद्रात पुरस्कार वितारणाचा कार्यक्रम झाला. कला आणि संस्कृती, शौर्य किंवा धाडस, संशोधन, विज्ञान – तंत्रज्ञान, क्रीडा, सामाजिक सेवा, पर्यावरण या क्षेत्रातील मुलांच्या प्रेरणादायी असाधारण कतृत्वाचे राष्ट्रपतींनी कौतुक केले.
पुरस्कार विजेत्यांच्या कतृत्वाचा देशाला अभिमान वाटत असल्याचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या. मुलांनी त्यांच्या असामान्य कतृत्वाने नवे आदर्श निर्माण केल्याचेही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या. पुरस्कार विजेत्या मुलांची कामगिरी आश्चर्यजनक आहे. या कामगिरीतून त्यांच्या अमर्याद क्षमतेची झलक बघायला मिळते, या शब्दात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मुलांचे कौतुक केले.
मुलांच्या कलागुणांना वाव देणे हे मोठ्यांचे कर्तव्य आहे. यातून नवनिर्मिती होईल. भारताच्या स्वातंत्र्याची शताब्दी २०४७ मध्ये साजरी होणार आहे, त्यावेळी हे पुरस्कार विजेते देशाचे सुबुद्ध नागरिक असतील. ही मुले विकसित भारताचे निर्माते होतील, असा विश्वास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केला.
अमरावतीची करीना थापा आणि मुंबईच्या केया हटकरला ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’
शौर्य क्षेत्रातला राष्ट्रीय बाल पुरस्कार
१. नऊ वर्षांच्या सौरव कुमारने बुडत असलेल्या तीन मुलींना वाचवले
२. सतरा वर्षांच्या इओआना थापाने इमारतीला आग लागल्याचे बघून ३६ रहिवाशांना वाचवले
३ अमरावतीच्या कठोरा परिसरातील जय अंबा अपार्टमेंटमध्ये १५ मे २०२४ रोजी लागलेल्या भीषण आगीच्या घटनेत करीना थापाने ७० कुटुंबांचे प्राण वाचवले
कला आणि संस्कृती क्षेत्रातला राष्ट्रीय बाल पुरस्कार
३. बारा वर्षांचा अयान सजाद सुफी गायक म्हणून प्रसिद्ध. काश्मिरी संगीतातील त्यांच्या योगदानासाठी लोकप्रिय
४. चौदा वर्षांची केया हटकर ही दिव्यांग लेखिका आणि वकील
५. पाच हजारांपेक्षा जास्त संस्कृत श्लोक तोंडपाठ करणारा सेरेब्रल पाल्सी झालेला सतरा वर्षांचा व्यास ओम जिग्नेश
संशोधन क्षेत्रातला राष्ट्रीय बाल पुरस्कार
६. पंधरा वर्षांच्या सिंधुरा राजाने पार्किंसन्स झालेल्यांना स्थैर्य देण्यासाठी वाजवी दरातली नाविन्यपूर्ण उपकरणे विकसित केली
७. सतरा वर्षांच्या ऋषीक कुमारने काश्मीरमध्ये पहिली सायबर सुरक्षा फर्म सुरू केली
क्रीडा क्षेत्रातला राष्ट्रीय बाल पुरस्कार
८. हेंबती नाग या नक्षलग्रस्त भागातील ज्युदो खेळाडूने खेलो इंडिया नॅशनल गेम्समध्ये रौप्य पदक जिंकले
९. तीन वर्षांच्या अनिश सरकारने बुद्धिबळात चमकदार कामगिरी केली, तो सर्वात लहान फिडे रँकिंग मिळवणारा बुद्धिबळपटू आहे
१०. एव्हरेस्ट बेस कॅम्प, आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर, ऑस्ट्रेलियाचे सर्वोच्च शिखर आणि रशिया आणि इराणची सर्वोच्च शिखरे येथे यशस्वी चढाई करणारी पंजाबची नऊ वर्षांची सानवी सूद.