Friday, May 9, 2025

महामुंबईमनोरंजनताज्या घडामोडी

Kaumudi Walokar Married : ‘साथ सात जन्माची’ म्हणत ‘आई कुठे काय करते’ फेम आरोही अडकली विवाहबंधनात

Kaumudi Walokar Married : ‘साथ सात जन्माची’ म्हणत ‘आई कुठे काय करते’ फेम आरोही अडकली विवाहबंधनात

मुंबई : मराठी कलाविश्वातील बहुतांश कलाकारांचा एकामागोमाग एक विवाहसोहळे गेल्या काही दिवसांत थाटामाटात पार पडताना पाहायला मिळतयं. अशातच मागील काही दिवसांपासून मराठी मनोरंजविश्वात 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री आरोही म्हणजेच कौमुदी वलोकरच्या लग्नाची चर्चा होती. अखेर आज २६ डिसेंबरच्या दिवशी अभिनेत्रीने तिच्या खऱ्या आयुष्यातील यश म्हणजेच आकाश चौकसे सोबत लग्नगाठ बांधून नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. नुकतेच सोशल मीडियावर कौमुदी-आकाशच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत.



कौमुदीने लग्नाचे फोटो शेअर करत त्यावर ‘साथ सात जन्माची’ असं कॅप्शन दिलं आहे. नववधू कौमुदी आणि आकाश या फोटोंमध्ये फारच सुंदर दिसत आहेत. आपल्या लग्नासाठी कौमुदी-आकाशने खास पारंपरिक पेहरावाला पसंती दिली आहे. शिवाय त्यांनी लग्नासाठी ट्विनिंग केल्याचं पाहायला मिळतंय. आकाशी रंगाची नऊवारी साडी त्यावर मराठमोळा साज असा साजशृंगार अभिनेत्रीने केला आहे. तर तिच्या पती आकाशने सोनेरी रंगाचा कुर्ता परिधान केलाय. नववधू कौमुदीला मराठी कलाकारांसह तिचे चाहते सोशल मीडियावर कमेंट्सच्या माध्यमातून शुभेच्छा देत आहेत.






 










View this post on Instagram























 

A post shared by Kaumudi Walokar (@kaumudiwalokar)





'आई कुठे काय करते' या मालिकेमुळे कौमुदी वलोकर प्रसिद्धीझोतात आली. अगदी गेल्या महिन्यातच कौमुदीचं केळवण पार पडलं.त्यानंतर अभिनेत्रीने तिच्या मित्रमंडळींसोबत ब्राईड टू बी पार्टी साजरी केली होती. अशातच इन्स्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून अभिनेत्रीने तिच्या मेहंदी सोहळ्याचे काही खास क्षण चाहत्यांसोबत शेअर केल्याचे पाहायला मिळाले. कौमुदीचा साखरपुडा गेल्या वर्षाच्या अखेरीस पार पडला होता. यानंतर कौमुदी विवाहबंधनात केव्हा अडकणार याची तिचे चाहते आतुरतेने वाट पाहत होते. अखेर तो क्षण आता आलेला आहे. कौमुदी आणि आकाश यांचा लग्नसोहळा थाटामाटात पडला आहे.

Comments
Add Comment