मुंबई : मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. सध्या मुंबई-पुणे प्रवासासाठी ३ ते ४ तासांचा कालावधी लागतो. मात्र आता हा प्रवास अवघ्या अर्ध्या तासात पार पडणार आहे. मुंबई पुणे दोन्ही महानगरांदरम्यान हायपरलूक वाहतूक व्यवस्था सुरु होणार आहे. हा भारतातील पहिला ‘हायपरपूल प्रकल्प‘ (Hyperloop Project) असणार आहे. यामुळे प्रवाशांच्या वेळेची मोठी बचत होणार असून वाहतुकीच्या अन्य माध्यमांच्या तुलनेमध्ये हा प्रकार अधिक सुरक्षित असणार आहे.
हायपरलूप प्रकल्प कॉक्रीट ट्यूब, मोटर कर्मशलायजेशन, मॅग्नेटीक लेविएशन मॉड्यूल अशा नव्या तांत्रिक कल्पनावर केले जात आहे. येत्या पाच वर्षात म्हणजेच २०२९ पासून ही वाहतूक व्यवस्था प्रवाशांच्या सोयीसाठी सज्ज होणार आहे. मुंबई-पुणे प्रवास हवाई मार्गाने करायचा असल्यास साधारणपणे ३,००० रुपये खर्च येतो. तर वंदे भारत एक्सप्रेसने हा प्रवास करताना ७५० रुपयांचे तिकीट काढावे लागते. मात्र या प्रवासासाठी १,००० ते १,५०० रुपये खर्च करावे लागणार आहेत. म्हणजेच या वाहतूक व्यवस्थेमुळे विमान, रेल्वेपेक्षा कमी खर्चात आणि तुलनेने कमी वेळेत मुंबई-पुणे प्रवास करता येणार आहे.
Flight Luggage Rules : हवाई प्रवाशांनो लक्ष द्या! विमानातील सामानाचे नियमावली बदलली
काय आहेत या मार्गाचे फायदे?
- गाडीने किंवा रेल्वेने हा प्रवास ३-४ तासांचा आहे. तेच आता अर्धा तासात प्रवास पूर्ण होईल.
- हायपरलूप वाहतूक व्यवस्था पूर्णपणे इकोफ्रेंडली आहे.
- मुंबई-पुणे या दोन महानगरांमधील औद्योगिक व्यवस्था, वाहतूक आणि पर्यटनाला चालना मिळेल.
- सर्वात महत्त्वाचे म्हणजे महामार्गावर होणार वाहतुकीचा प्रश्न सुटेल.
प्रकल्पासमोरील आव्हाने कोणती?
- इलेक्ट्रोमॅग्नेटिक लेव्हिएशन आणि ट्यून सिस्टीममध्ये नव्या अपडेटची गरज आहे.
- प्रकल्पासाठी कायदेशीर तरतूदी पूर्ण करत त्यासाठी परवानगी मिळवणे.
- प्रकल्पाचे योग्य नियोजन करुन निधीचा योग्यपणे वापर करणे.
- अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असे हायपरलूप नेटवर्क तयार करणे.