Tuesday, March 25, 2025
Homeताज्या घडामोडीFlight Luggage Rules : हवाई प्रवाशांनो लक्ष द्या! विमानातील सामानाचे नियमावली बदलली

Flight Luggage Rules : हवाई प्रवाशांनो लक्ष द्या! विमानातील सामानाचे नियमावली बदलली

मुंबई : सध्या नाताळ सण सुरु असून अनेक ठिकाणी ख्रिसमसच्या सुट्ट्या लागू झाल्या आहेत. तसेच नववर्ष सुरु होण्यास अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे अनेकजण नववर्षाच स्वागत आणि सुट्ट्या घालवण्यासाठी बाहेरगावी जात आहेत. अशातच या सुट्ट्यांच्या कालावधीत विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

Pune : पुणे हादरलं! खेळताना बेपत्ता झालेल्या चिमुकल्यांचे दयनीय अवस्थेत आढळले मृतदेह

प्रवाशांची वाढती संख्या पाहता विमानातील सामानाच्या नियमावलीत (Flight Luggage Rules) बदल करण्यात आला आहे. नागरिक उड्डयन ब्युरो (BCAS) ने हँड बॅग पॉलिसीमध्ये बदल केला आहे. त्यानुसार, आता प्रवासी फ्लाइटच्या आत केवळ एकच हँड बॅग घेऊन जाऊ शकणार आहेत. हे नियम देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान सेवांसाठी लागू आहेत.

इकॉनॉमी क्लासचे प्रवासी ८ किलोपर्यंत वजन वाहून नेऊ शकतात. तर प्रीमियम इकॉनॉमी प्रवासी १० किलोपर्यंत वजन वाहून नेऊ शकतात.फर्स्ट आणि बिझनेस क्लासचे प्रवासी १२ किलोपर्यंत वजन वाहून नेऊ शकतात. तसेच ३ किलोपेक्षा कमी वजन असणाऱ्या लेडीज पर्स किंवा एक लहान लॅपटॉप बॅग सुद्धा घेऊन जाऊ शकणार आहात.

हँडबॅगेचा आकार

उंची : ५५ सेमी (२१.६ इंच) लांबी : ४० सेमी (१५.७ इंच) रुंदी : २० सेमी (७.८ इंच) हँडबॅगेच्या बदलेल्या नियमानुसार त्याचा आकार अशा असणे अपेक्षित आहे. दरम्यान, नियमांचे पालन न केल्यास अतिरिक्त शुल्क किंवा दंड भरावा लागेल, असे सांगण्यात आले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -