मुंबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बुधवारी आयसीसीची(icc) ताजी रँकिंग जाहीर केली. यात भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराहने धमाल करताना इतिहास रचला आहे. बुमराह आयसीसी टेस्ट बॉलिंग रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर काबीज आहे. याशिवाय त्यांचे रेटिंग पॉईंट्स ९०० पार आहे.
जसप्रीत बुमराहचे रेटिंग पॉईंट्सही ९०४ झाले आहेत. हा आपला ऐतिहासिक रेकॉर्ड आहे. बुमराह इतके रेटिंग मिळवणारा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज आहे. ओव्हरऑल दुसरा भारतीय गोलंदाज बनला आहे. त्याने स्टार स्पिनर रवीचंद्रन अश्विनची बरोबरी केली आहे.
गाबा कसोटीत बुमराहने मिळवल्या होत्या ९ विकेट
भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. येथे दोन्ही संघादरम्यान बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी अंतर्त ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. तिसरा सामना नुकताच ब्रिस्बेनच्या गाबा स्टेडियममध्ये खेळवण्यात आला होता. ही कसोटी अनिर्णीत राहिली होती. यात बुमराहने पहिल्या डावात ७६ धावा देत ६ विकेट मिळवल्या होत्या.
तर बुमराहने गाबा कसोटीच्या दुसऱ्या डावात १८ धावांत ३ विकेट मिळवल्या होत्या. या जबरदस्त कामगिरीचा फायदा त्यांना झाला आणि ९०४ रेटिंगसह ऐतिहासिक रेकॉर्ड कायम केला. मालिकेतील पहिल्या कसोटीत बुमराहने ८ विकेट आणि दुसऱ्या कसोटीत ४ विकेट घेतल्या होत्या.
Virat Kohli : ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजाला धक्का देणाऱ्या विराट कोहलीला सामनाधिकाऱ्यांचा दणका
अश्विन आणि जडेजा टॉप १०मध्ये काबीज
गाबा कसोटी अनिर्णीत झाल्यानंतर स्पिनर रवीचंद्रन अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. मात्र आताही तो आयसीसीच्या रँकिंगमध्ये पाचव्या स्थानावर काबीज आहे. त्याचे ७८९ रेटिंग पॉईंट्स आहेत. यानंतर यादीत तिसरा गोलंदाज स्पिनर रवींद्र जडेजा आहे. त्याला ४ स्थानांचे नुकसान झाले आहे. आता तो १०व्या स्थानावर घसरला आहे.