सोलापूर : गांजाच्या केससाठी झालेल्या खर्चाचे सात लाख रुपये दिल्याशिवाय सोडणार नाही, असे म्हणत सात ते आठ जणांनी कोयत्याचा धाक दाखवून एकाचे अपहरण केले. ही घटना मोहोळ तालुक्यातील अनगरपाटी जवळ घडली. अक्षय गोडसे व संतोष चव्हाण या दोघांना अटक केली आहे. इतरांचा तपास सुरु आहे. या प्रकरणी मोहोळ पोलीस ठाण्यात अपहरण झालेल्या व्यक्तीच्या पत्नी विद्या राजकुमार घोलप यांनी फिर्याद दाखल केली आहे.
Bal Puraskar : वीर बालदिनी राष्ट्रपतींच्या हस्ते १७ मुलांचा राष्ट्रीय बाल पुरस्काराने गौरव
मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील ७ ते ८ महिन्यांपूर्वी राजकुमार बाळासाहेब घोलप (रा. तेलंगवाडी ता. मोहोळ), आकाश बारटक्के, ऋषिकेश शिंदे व मिलिंद मोरे (रा. संगम, ता. माळशिरस) अशा चार जणांवर टेंभुर्णी पोलीस ठाणे येथे गांजाचा गुन्हा दाखल झाला होता. त्यामध्ये फिर्यादीचे पती राजकुमार घोलप व इतर लोकांना अटक झाली होती. सध्या ते सर्वजण जमीनावर आहेत.