Health: थंडीच्या दिवसांत नाही वाढणार वजन, दररोजच्या डाएटमध्ये सामील करा हे ६ पदार्थ

Share

मुंबई: थंडीचे दिवस आले की अंथरुणातून उठायचे मन करत नाही. दिवसभर रजई अंगावर ओढून घ्यावेसे वाटते. अनेकजण तर लोळतच पडलेले असतात. अशातच फिजीकल अॅक्टिव्हिटी कमी होते आणि अधिक खाणे होत असल्याने त्याचा परिणाम वजनावर होतो. येथे काही स्न्रॅक्सचे प्रकार आहेत जे तुम्ही डाएटमध्ये सामील करू शकता आणि अगदी सहज वजन घटवू शकता.

प्रोटीन्स आणि फायबर्सनी भरपूर भाजलेले छोले ब्रेकफास्टमध्ये खाल्ल्याने पोट चांगल्या पद्धतीने भरते. शिजवलेले चणे ऑलिव्ह ऑईल, पेपरिका आणि एक चिमूट मिठासोबत मिसळून कुरकुरीत होईपर्यंत भाजा. यातील फायबर पाचनतंत्राला चांगले बनवते आणि पोटाला दीर्घकाळ भरलेले ठेवते.

ग्रीन टी, बदामाचे दूध आणि दालचिनी अथवा वेलचीसोबत बनवून प्यायल्याने शरीरातील कॅलरी कमी आणि अँटीऑक्सिडंट अधिक मिळतात. ग्रीन टीमधील कॅफेन आणि कॅटेचिन फॅट बर्न करण्यास आणि मेटाबॉलिज्म वाढवण्यास मदत करतात.यामुळे वजन वेगाने कमी होऊ शकते.

बदाम, अक्रोड आणि कद्दूच्या बियांमध्ये हेल्दी फॅट्स, प्रोटीन आणि गरजेची पोषकतत्वे असतात. यामुळे शरीर अॅक्टिव्ह राहण्यास मदत होते. यात मिरची पावडर आणि दालचिनीसोबत हलके भाजून खा. यामुळे वजन नियंत्रित राहते.

रताळ्यामध्ये फायबर, व्हिटामिन ए आणि अँटीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात असतात. रताळ्याचे पातळ काप करून ऑलिव्ह ऑईलमध्ये बेक करा. यामुळे शरीर हेल्दी आणि फिट राहण्यास मदत होते.

Recent Posts

KKR vs GT, IPL 2025: गुजरातविरुद्ध घरच्या मैदानावर कोलकत्त्याचा लाजिरवाणा पराभव

कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…

3 hours ago

उबाठाला राणेंचा दणका! सिंधुदुर्गात होणार १५०० कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश!

२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…

3 hours ago

ही कणकवली नव्हे, कुडाळ आहे! निलेश राणे यांच्याशी पंगा नको!

माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…

4 hours ago

नाल्यातून गाळ काढताना ३० सेकंदाचा व्हिडीओ कंत्राट कंपनीला बंधनकारक

लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…

5 hours ago

PM Modi : आजची धोरणं, उद्याचं भारत! – पंतप्रधान मोदींचा नागरी सेवकांना मंत्र

PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…

5 hours ago