
नांदेड : राज्यभरात तापमानाचा पारा घसरला असून थंडीने चांगलाच जोर धरला आहे. मात्र काही ठिकाणी ऐन हिवाळ्यात पावसाची रिपरिप सुरुच असल्याचे दिसून येत आहे. या बदलत्या वातावरणाचा (Weather Update) फटका शेतकऱ्यांना बसत आहे. एकीकडे महागाई वाढत असताना दुसरीकडे कापूस, सोयाबीनसह फळांच्या किमती घसरत चालल्या आहेत. त्यामुळे उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.

नाशिक : नाशिकमधील (Nashik) त्र्यंबकेश्वर मंदिरात (Trimbakeshwar Temple) भाविकांची नेहमीच मोठी गर्दी असते. अशातच सध्या नाताळची सुट्टी सुरु असून अनेकजण विविध ...
कापसाच्या दरात पुन्हा घसरण
काही दिवसांपूर्वी कापसाच्या दरात एक हजार रुपयांची घसरण झाली (Cotton Price Fall) होती. अशातच आता पुन्हा कापसाच्या किंमतीत ६०० रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली असल्याचे दिसून येत आहे.
पपईला मिळतोय कवडीमोल भाव
बदलत्या वातावरणाचा फटका पपईवरही पडत (Papaya Price Fall) आहे. नांदेडमधील एका शेतकऱ्याने दीड लाख रुपये खर्च करुन पपईची लागवड केली होती. परंतु वातावरणातील बदलाचा फटका या पपईला बसत असून बाजारात पपईला कवडीमोल भाव मिळत आहे, असे शेतकऱ्यांनी सांगितले.