Saturday, March 22, 2025
Homeताज्या घडामोडीCab driver : एनआरआयची फसवणूक करणाऱ्या कॅब चालकाला अटक

Cab driver : एनआरआयची फसवणूक करणाऱ्या कॅब चालकाला अटक

मुंबई : मुंबईत एका विदेशी भारतीय नागरिकाला (NRI) रिक्षा चालकाने जास्तीचे पैसे उकळल्याचा प्रकार समोर आला. काही दिवसांपूर्वी एका तरुणासोबत अशीच घटना घडली होती. त्यानंतर आता मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलेलेल्या एका नॉन रेसिडेन्शियल इंडियन (एनआरआय) व्यक्तीबरोबर असाच प्रकार घडला. टॅक्सी चालकाने (Cab driver) या व्यक्तीला विलेपार्लेपर्यंतच्या अवघ्या १० मिनिटांच्या प्रवासासाठी २,८०० रुपये द्यायला लावण्यात आले.

सहार पोलीस स्टेशनमधील एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १५ डिसेंबर रोजी घडली. डी विजय हे ऑस्ट्रेलियाहून मुंबई विमानतळावर मध्यरात्रीच्या सुमारास पोहचले. ऑस्ट्रेलियात रहाणारे आणि मूळ नागपूर येथील विजय यांनी पोलिसांना सांगितले की, विमानतळाबाहेर येताच कॅब चालक विनोद गोस्वामी त्याच्याजवळ आला. तसेच त्याने विजय यांना बनावट अॅप दाखवून फसवणूक केली. विजय यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गोस्वामी याला अटक केली.

Manisha Khatri : नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी मनीषा खत्री यांची नियुक्ती

विजय हे मुंबई विमानतळावरून गोस्वामींबरोबर गेले. पण विजय यांना टॅक्सीचे पैसे देताना काहीतरी गडबड झाल्याचा संशय आला. त्यामुळे त्यांनी उतरलेल्या हॉटेलमध्ये यासंबंधी चौकशी केली. हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना सांगितले की ते त्यांच्या पीक अप सेवेसाठी ७०० रुपये घेतात. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी सहार पोलिसांना कॅब चालकाच्या मोबाईल क्रमांकासह ई-मेल पाठवून तक्रार केली. गोस्वामीने विजय यांना पुढच्या वेळी शहरात आलात तर कॉल करा, असे म्हणून स्वत:चा फोन नंबर दिला होता. या नंबरच्या मदतीने पोलिसांनी गोस्वामीचा १२ तासांच्या आत शोध लावला आणि त्याचे वाहन देखील जप्त केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -