सोलापूर : राज्य सरकारच्या पिंक ई- रिक्षा योजनेचा लाभ घेण्यासाठी २१ ते ४० वयोगटातील महिला पात्र असणार आहेत, ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तीन लाखांपर्यंत आवश्यक आहे. पिंक ई-रिक्षा योजनेअंतर्गत रिक्षा घेण्यासाठी महिलांना स्वतःला केवळ १३ हजार रुपयेच द्यावे लागणार आहेत. २० टक्के रक्कम सरकारकडून अनुदान म्हणून मिळणार असून ७० टक्के रकमेचे बँकेतून कर्ज मिळणार आहे.रिक्षा चालविणे हा स्वयंरोजगाराचा भाग असू यासाठी सर्व टॅक्ससह ई-रिक्षांच्या एकूण किमतीवर राज्य सरकारकडून २० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. पाच वर्षांच्या मुदतीसाठी ७० टक्के रकमेचे कर्ज उपलब्ध करून उर्वरित १० टक्के रक्कम संबंधित महिलेला गुंतवावी लागणार आहे.
Pune Solapur Highway : पुणे- सोलापूर महामार्गावर बस-ट्रकचा भीषण अपघात
‘पिंक ई-रिक्षा’ योजनेच्या लाभासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न तीन लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. अर्जदार महिलेकडे वाहन चालक परवाना असणे आवश्यक आहे. दारिद्र्यरेषेखालील महिलांना योजनेत प्राधान्य असून, सर्व स्तरांतील महिलांना योजनेत अर्ज करता येणार आहे.