पुणे : सोलापूर महामार्गावरी अपघाताचं सत्र सुरुच असून कंटेनरला लागलेल्या भीषण आगीनंतर आता पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या लक्झरी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, १५ ते २० जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात बुधवारी पहाटेच्या वेळी झाला.
Ujani Dam Water : भीमा नदीचे पाणी ५ जानेवारीला औज बंधाऱ्यात पोचणार
लक्झरी बस पुण्याच्या दिशेने निघाली होती. पुढे निघालेल्या ट्रकला बसने पाठीमागून धक्का दिला, आणि भीषण अपघात घडला. अपघातात एकाचा मृत्यू झाला. दौंड तालुक्यातील खडकीनजिक विसावा हॉटेलसमोर हा अपघात झाला. जखमींना भिगवणमधील दवाखान्यात तातडीने हलविण्यात आले.
या अपघातामुळे महामार्गावर वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. घटनास्थळी वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांनी अवघ्या काही तासांत कार्यवाही केली. नेमका अपघात कशामुळे झाला याची नेमकी माहिती मिळालेली नाही. अपघाताची अधिक माहिती मिळवण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे. यातील जखमींच्या स्थितीवर लक्ष ठेवले जात असून, पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे की, अपघात ट्रक आणि बसच्या वेगाच्या तफावतीमुळे झाला असावा.या अपघाताने पुणे-सोलापूर महामार्गावर सुरक्षा नियमांचे पालन आणि वाहतूक नियंत्रण किती महत्त्वाचे आहे, हे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.