पुणे : नाताळसणानिमित्त (Christmas Holiday) अनेक शाळांसह काही कार्यालयांना सुट्टी असते. त्यामुळे या कालावधीत अनेकजण आपल्या मित्रपरिवारासह फिरायला जाण्याचे प्लॅन तयार करतात. अशातच आजही सुट्टीनिमित्त अनेकजण पर्यटनस्थळी जाण्यासाठी निघाले आहेत. मात्र यामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी (Traffic Jam) झाल्याचे दिसून येत आहे. अशातच पुण्याहून साताराकडे जाणाऱ्या खंबाटकी घाटातही (Khambatki Ghat) मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्या असल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.
Shirdi Saibaba : शिर्डीतील साईंच्याचरणी कोट्यावधींचे दान; वर्ष संपत आले तरी भाविकांची गर्दी कायम
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याहून सातारला जाताना खंबाटकी घाट या एकेरी मार्गावर अनेक वाहने बंद पडली आहेत. त्यामुळे आज सकाळपासूनच या मार्गावर जवळपास ४ ते ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. जवळपास एका-दीड तासापासून घाटात वाहतूक कोंडी झाली आहे.
दरम्यान, एकाच ठिकाणी वाहने थांबून राहिल्यामुळे प्रवास करणाऱ्या लहान मुले, महिलांसह वयोवृद्ध नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.