शिर्डी : जगातील सर्व भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांच्या झोळीत या वर्षी भाविकांनी भरभरून दान टाकले आहे. एकामागोमाग आलेल्या सुट्ट्यांमुळे शिर्डीच्या साईबाबांच्याचरणी भाविकांची मांदियाळी दिसून आली. शिर्डीच्या साईबाबा समाधी मंदिरात या वर्षभरात सुमारे तीन कोटींहून अधिक भाविकांनी हजेरी लावली.त्यांनी तब्बल ८१९ कोटी रुपयांची देणगी विविध माध्यमांतून दिली आहे. अद्याप वर्षअखेरीच्या जोडून आलेल्या सुट्ट्यांचे काही दिवस शिल्लक आहेत. तरीही गेल्या वर्षीच्या तुलनेत १५ कोटी रुपये अधिक उत्पन्न संस्थानला मिळाले आहे.
Governor VK Singh : माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंह मिझोरमचे राज्यपाल
मंदिरात भेट दिलेल्या भाविकांनी ४५१ कोटी रुपयांची देणगी दानपेटीत टाकली, तर अन्य माध्यमांतून मिळून ८१९ कोटी ५७ लाख रुपये संस्थानला मिळाले आहेत. मागील वर्षापेक्षा त्यात १५ कोटी ६४ लाखांची भर पडली आहे. अर्थात वर्ष संपायला अद्याप वेळ आहे. शिवाय नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शिर्डीत लाखो भाविक भेट देत असल्याने या काळात देणगी आणखी वाढत असते.साईबाबा संस्थानाला विश्वस्त मंडळ नसल्याने न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीतर्फे कामकाज केले जाते. संस्थानच्या या वर्षीच्या अहवालाला विधिमंडळाच्या अधिवेशनात नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे. त्यातून ही माहिती समोर आली.