Kaun Banega Crorepati 16: पत्नी जया बच्चन यांच्याकडून पैसे मागतात अमिताभ बच्चन

मुंबई: कौन बनेगा करोडपती १६(Kaun Banega Crorepati 16) हा रिअॅलिटी शो सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या शोमध्ये अमिताभ बच्चन आपल्या खाजगी आयुष्यातील गोष्टीही शेअर करत असतात. अमिताभ बच्चन प्रेक्षकांचे खूप मनोरंजन करत असतात नुकतीच त्यांनी आपल्या पत्नीबद्दलची एक गोष्ट सांगितले.


जेव्हा एका स्पर्धकाने अमिताभ बच्चन यांच्या दररोज मिडल क्लास फॅमिलीच्या संबंधित प्रश्न विचारले तेव्हा अमिताभ यांनी मजेशीर उत्तरे दिली.


तुमचं घर एवढं मोठं आहे, रिमोट हरवलं तर ते कसं शोधता.". या प्रश्नापासून सुरुवात झाली. शीघ्र विनोदासाठी प्रसिद्ध असलेले अमिताभ बच्चन म्हणाले, "मी थेट सेट टॉप बॉक्सजवळ जाऊन त्याद्वारे कंट्रोल करतो.."


पुढच्या संवादात स्पर्धकाने मध्यम वर्गीय कुटुंबासंबंधी आणखी प्रश्न विचारले. या प्रश्नांमुळे प्रश्नमंजुषेच्या या कार्यक्रमात हास्यकल्लोळ उडाला. प्रियंकाने विचारले, "सर, मध्यमवर्गीय कुटुंबात रिमोट हरवलं तर भांडणं होतात. तुमच्याकडेही असं होतं का?".. अमिताभ बच्चन म्हणाले, "नही देवी जी... हमारे घर में ऐसा नही होता.. सोफें पर दोन तकिये होते है.. रिमोट उस में छुप जाता है.. बस वहीं ढुंढना पडता है.."


प्रियंकाने पुढचा प्रश्न विचारला, "मी ऑफिसमधून घरी जाते तेव्हा मम्मी सांगते, येताना कोथिंबीर आण.. जया मॅडम तुम्हालाही असं काही आणायला सांगतात का? " अमिताभ बच्चन म्हणाले, " हो सांगतात ना.. तुम्ही स्वत:ला घरी आणा.."


प्रियंकाने शेवटचा प्रश्न विचारला, "सर, एटीएममधून कॅश काढायची असताना तुम्ही कधी बॅलेन्स चेक केलंय का?" अमिताभ बच्चन यांनी तत्काळ उत्तर दिलं, "मी माझ्याकडे कॅश बाळगतच नाही.. आणि मी कधी एटीएममध्येही गेलो नाही. ते कसं वापरतात, हे मला कळत नाही. पण जयाजींकडे कॅश असते.मी त्यांनाच पैसे मागतो. जयाजींना गजरा खूप आवडतो. तर रस्त्यात मी लहान मुलाकडून गजरा विकत घेतो. तो गजरा कधी जयाजींना देतो तर कधी गाडीतच ठेवतो. कारण त्याचा सुगंध मला खूप आवडतो.. "


प्रियंकाचे खेळकर प्रश्न आणि मि. अमिताभ बच्चन यांची चपखल उत्तरं यामुळे हा एपिसोड विनोद आणि भावनिक क्षणांनी भारलेला ठरला. कौन बनेगा करोडपती हा कार्यक्रम कोट्यवधी लोकांना का आवडतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं.

Comments
Add Comment

हाय-प्रोफाइल लग्नातही करण जोहर जेवत नाही; कारण ऐकून बसाल थक्क

मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माते करण जोहर आपल्या चित्रपटांसोबतच स्पष्टवक्तेपणासाठीही

दिग्पाल लांजेकर यांच्या श्री शिवराज अष्टकातील सहावे पुष्प भेटीला

‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपटाचा दमदार टिझर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य उभारणीत त्यांच्या

खलनायक अक्षय खन्नाच्या भूमिकेचा जलवा, ‘धुरंधर’ने मोडले ‘छावा’-‘पुष्पा २’चे रेकॉर्ड

मुंबई : ‘छावा’ आणि ‘पुष्पा २’नंतर बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा मोठा भूकंप घडवणारा सिनेमा म्हणजे ‘धुरंधर’. आदित्य धर

ज्येष्ठ संगीतकार ओ. पी नय्यर यांना मरणोत्तर मोहम्मद रफी जीवन गौरव पुरस्कार जाहीर

मंत्री आशिष शेलार यांची घोषणा; गायिका उत्तरा केळकर यांना मोहम्मद रफी पुरस्कार मुंबई: हिंदीमधील अजरामर

‘एकाकी’मधील जॉनर बदलासाठी आशिष चंचलानीचे एस.एस. राजामौलींने केले कौतुक

आशिष चंचलानी, जे भारतातील सर्वात मोठ्या डिजिटल स्टार्सपैकी एक आहेत आणि ज्यांची देशभरात जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे,

साऊथचे सुपरस्टार 'रजनीकांत' चे काय आहे खरे नाव ?

रजनीकांत म्हणून ओळखले जाणारे दाक्षिणात्य तसेच हिंदी चित्रपटांमद्धे नावाजलेले असे ,'थलायवा' अर्थात रजनीकांत