१४७ वर्षात पहिल्यांदा...मेलबर्न कसोटीत भारत रचणार इतिहास?

  71

मुंबई: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २०२४-२५ सध्या रोमहर्षक वळणावर आली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. ही कसोटी मालिका सध्या १-१ अशा बरोबरीत आहे. आता भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चौथा कसोटी सामना २६ डिसेंबर ते ३० डिसेंबरदरम्यान खेळवला जाणार आहे. मेलबर्नच्या क्रिकेट ग्राऊंडवर हा सामना असणार आहे. हा कसोटी सामना जिंकत भारत आपल्या नावावर एक खास रेकॉर्ड करू शकतो. हा रेकॉर्ड करताना टीम इंडिया १९८५मध्ये चुकली होती.



काय आहे तो खास रेकॉर्ड


मेलबर्नमध्ये भारताचा रेकॉर्ड आतापर्यंत मिळताजुळता राहिला आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत १४ कसोटी सामने खेळवण्यात आले. यातील ऑस्ट्रेलियाने ८ सामने जिंकले तर भारताने चार सामने जिंकलेत. दोन कसोटी सामने अनिर्णीत राहिले. मात्र टीम इंडिया या मैदानावर आतापर्यंत विजयाची हॅटट्रिक लावू शकलेली नाह. दरम्यानच्या, हल्लीच्या वर्षांमध्ये भारतीय संघाचे भारतीय संघाची कामगिरी मेलबर्नमध्ये मजबूत राहिली आहे यामुळे चाहते आणि संघाचा आत्मविश्वास वाढला आहे.


भारत मेलबर्न कसोटीत २०१८ला १३७ धावांनी जिंकण्यात यशस्वी ठरला होता. यानंतर भारताने मेलबर्न कसोटी २०२०मध्ये ऑस्ट्रेलियाला ८ विकेटनी हरवले. मेलबर्नमध्ये भारताचा हा सलग दुसरा विजय आहे. आता टीम इंडिया मेलबर्न २०२४ कसोटी जिंकत मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर विजयी हॅटट्रिकचा रेकॉर्ड बनवू शकते.

Comments
Add Comment

जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत पी. व्ही. सिंधूचा प्रवास उपांत्यपूर्व फेरीतच थांबला

पॅरिस : भारताची स्टार बॅडमिंटनपटू आणि दोन वेळा ऑलिंपिक पदक विजेती पी. व्ही. सिंधूचे जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप

आशिया कप २०२५ पूर्वी बीसीसीआयमध्ये मोठे बदल, राजीव शुक्ला बनले हंगामी अध्यक्ष

मुंबई : एशिया कप 2025 मध्ये भारताचा पहिला सामना 10 सप्टेंबर रोजी यूएई विरुद्ध होणार आहे,त्याला सुरू होण्यास आता दोन

Lionel Messi: लिओनेल मेस्सीचे निवृत्तीचे संकेत... ४ सप्टेंबर रोजी खेळणार शेवटचा घरगुती सामना!

बुएनोस आइरेस: फुटबॉलचा जादूगार लिओनेल मेस्सीने निवृत्तीचे संकेत देत, जगभरातील त्याच्या लाखो चाहत्यांना धक्का

Diamond League 2025 Final : नीरज चोप्रा दुसऱ्या स्थानावर, ज्यूलियन वेबरने जिंकले विजेतेपद

झुरिच: भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राला स्वित्झर्लंडमधील झुरिच येथे झालेल्या डायमंड लीग २०२५ च्या अंतिम

मुस्लिम असल्याने मला ट्रोल करतात : शमी

मुंबई (प्रतिनिधी) : भारतीय संघातील अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने अगामी आशिया चषकासाठी निवड न झाल्याबद्दल

पीव्ही सिंधू बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या क्वार्टर फायनलमध्ये

पॅरिस : दुहेरी ऑलिंपिक पदक विजेती पीव्ही सिंधूने बीडब्ल्यूएफ बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या क्वार्टर