Christmas: रणबीर-आलियाच्या राहा कपूरने पापाराझींना दिल्या ख्रिसमसच्या क्यूट शुभेच्छा

मुंबई : आज सगळीकडे ख्रिसमसचं(Christmas) जोरदार सेलिब्रेशन सुरु आहे. जगभरातील माणसं आज ख्रिसमसचं जोरदार सेलिब्रेशन करत आहेत. अशातच बॉलिवूडमधील सर्वांची लाडकी राहाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.अभिनेत्री आलिया भट्टची मुलगी राहाने आज मीडियाला पाहताच ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या आहेत.


रणबीर-आलियाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेला आहे. या व्हिडीओत पहिल्यांदा आलिया सर्व मीडियाला गोंगाट करु नका, म्हणून विनंती करताना दिसते. त्यांनतर पुढे रणबीर त्याच्या कडेवर राहाला सर्वांसमोर घेऊन येतो. राहा मीडियाला पाहताच हात हलवत "हाय, मेरी ख्रिसमस" असं म्हणताना दिसते. राहाच्या या क्यूट बोलण्याने रणबीर-आलियालाही सुखद धक्का बसतो. पुढे मीडिया फोटो - व्हिडीओमुळे राहावर फ्लॅश मारते. त्यामुळे राहा तोंड खाली करताना दिसते.






दरम्यान, रणबीर-आलियाने गेल्या वर्षी डिसेंबरमध्येच राहाला पहिल्यांदाच मीडियासमोर आणलं होतं. त्यांनतर आता पुन्हा एकदा २०२४ च्या ख्रिसमसमध्ये रणबीर-आलियाने राहाला सर्वांसमोर आणलंय. यावेळी राहा पहिल्यांदा मीडियासमोर बिनधास्त बोलताना दिसली.आणि तिने मीडियाने ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या आहेत. राहाचे हे गोड व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर सर्वत्र तुफान व्हायरल होत आहेत. तिचा हा क्यूट अंदाज पाहून सगळे जण भारावून गेले आहेत

Comments
Add Comment

धर्मेंद्र यांची कोट्यावधींची मालमत्ता! कोण होणार 'वारसदार'?

मुंबई: अभिनेते धर्मेंद्र यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. आज सकाळी त्यांना डिस्चार्ज

बॉलीवूड अभिनेता गोविंदाची प्रकृती स्थिर

मुंबई: गेल्या काही महिन्यांपासून अभिनेता गोविंदा त्याच्या खासगी आयुष्यामुळेही सतत चर्चेत आहे. मात्र यावेळी

धर्मेंद्र यांची प्रकृती सुधारली, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला

मुंबई : बॉलीवूडचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्याबाबत एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुंबईतील ब्रीच कँडी

Gautami Patil : नृत्य नाही, आता शौर्य! गौतमी पाटीलचं 'नऊवारी' गाणं रेकॉर्ड ब्रेक, चाहत्यांकडून तुफान लाईक्स

मुंबई : आपल्या दमदार नृत्यकौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी लोकप्रिय नृत्यांगणा गौतमी पाटील

'ऊत' चित्रपटाचा शानदार ट्रेलर प्रकाशित

जिद्दी युवकाच्या संघर्षाची कथा २१ नोव्हेंबरला चित्रपटगृहात समाजातील दाहक वास्तवावर प्रकाशझोत टाकणाऱ्या

धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर, मुलगी ईशा देओलने दिली माहिती

मुंबई: बॉलिवूडचा हीमॅन धर्मेंद्र यांच्यां प्रकृतीमध्ये सुधारणा होत आहे, अशी माहिती त्यांची मुलगी ईशा देओलने