
सोलापूर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य स्त्रोतांपैकी औज बंधारा हा एक असून सध्या त्यात दहा दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा आहे. महापालिकेच्या पत्रानुसार सोलापूरकरांच्या पाण्याचा प्रश्न सुटावा म्हणून २६ डिसेंबर रोजी उजनी धरणातून भीमा नदीद्वारे पाणी सोडले जाणार आहे. ५ जानेवारीला ते पाणी औज बंधाऱ्यात पोचेल, असे नियोजन करण्यात आले आहे.

बर्फवृष्टीमुळे २२३ रस्ते बंद; १,५०० वाहने बर्फात अडकली, ८ हजार पर्यटकांची २४ तासानंतर सुटका आणखी दोन दिवस बर्फवृष्टी आणि पावसाचा इशारा शिमला : हिमाचल ...
ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांची यात्रा, मकर संक्राती या सण-उत्सवामुळे सोलापूर शहरासाठी पाणी लागणार आहे. सोलापूर ते उजनी या समांतर जलवाहिनीचे काम देखील अजून पूर्ण झाले नाही. त्यासाठी आणखी काही दिवसांची वाट पाहावी लागणार असून तीन महिने त्या पाइपलाइनचे प्रात्यक्षिक होणार आहे. त्यामुळे औज बंधाऱ्यातील पाणी सोलापूर शहरासाठी महत्त्वाचे असणार आहे. त्यामुळे आता उजनीतून औज बंधाऱ्यात पाणी सोडले जाणार असून साधारणत: १५ दिवसांत ते त्याठिकाणी पोचेल. या आवर्तनासाठी उजनीतील सहा टीएमसी पाणी संपणार आहे.