Friday, March 28, 2025
Homeताज्या घडामोडीvirar Accident : चिमुकल्याच्या अंगावरुन गाडी गेली अन् थोडक्यात वाचला जीव!

virar Accident : चिमुकल्याच्या अंगावरुन गाडी गेली अन् थोडक्यात वाचला जीव!

मुंबई : सध्या सातत्याने हिट अँड रनच्या घटना समोर येत असताना वसईमध्येही अशीच एक घटना घडल्याचे समोर (virar Accident) आले आहे. एका चिमुकल्याच्या अंगावरुन कार गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. इतकेच नव्हे तर या प्रकारानंतर चालकही फरार झाला आहे.

आज सकाळी १० वाजून २१ मिनिटांच्या सुमारास ही घटना घडली. वसई पूर्वेच्या शिव भिम नगर, नाईकपाडा, वाळीव येथे मोकळ्या जागेत एम.एच. ०१ ई एम ३२४५ या क्रमांकाची कार एका प्रवाशाने ओला ॲपवरुन बुक करुन मागवली होती. त्याचठिकाणी राघवकुमार चव्हाण उर्फ छोटू (५) हा मुलगा खेळत असताना कारचालकाने कार बेदराकपणे चालवत पुढे मुलगा बसलेला असल्याच न बघता त्याच्या अंगावरुन गाडी चढवली आणि फरार झाला.

Kazakhstan Plane Crash : कझाकिस्तानमध्ये विमान कोसळून चक्काचूर!

या घटनेनंतर स्थानिकांनी थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो काही ही न ऐकता तेथून निघून गेला. तसेच तेथील लोकांनी ज्याने ओला बुक केली होती त्याच्याशी संपर्क साधला. त्याने ही आपण कार चालकाला घेवून येतो असे सांगत मोबाईलच स्वीच ऑफ केल्याची माहिती तेथील नागरीकांनी दिली आहे.

दरम्यान, सध्या लहानग्याला वाळीवच्या वालवादेवी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्याच्या हाताला, डोक्याला, छातीला दुखापत झाली असून, त्याची प्रकृती सध्या चिंताजनक आहे. तसेच या घटनेचा संपूर्ण व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -