Monday, May 12, 2025

महामुंबईताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Rape on Puppy : कुत्र्याच्या पिलावर अत्याचार, नराधमाची जामिनावर सुटका

Rape on Puppy : कुत्र्याच्या पिलावर अत्याचार, नराधमाची जामिनावर सुटका
मुंबई : अवघ्या दीड महिन्यांच्या कुत्र्याच्या पिलावर अत्याचार झाला. हे विकृत कृत्य केल्याचा आरोप असलेल्या नराधमाची जामिनावर सुटका झाली आहे. या प्रकरणात मुक्या जीवाला न्याय मिळावा म्हणून एक प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री सरसावली आहे.




पोलिसांनी कुत्र्याच्या पिलावरील अत्याचार प्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. आरोपीची जामिनावर सुटका झाली आहे. ही माहिती मिळताच प्राणीप्रेमी संस्थांनी कुत्र्यावर अत्याचार करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करत सोशल मीडियावर विशेष मोहीम हाती घेतली आहे.



'क्योंकी सास भी कभी बहू थी' या टीव्ही मालिकेमुळे लोकप्रिय झालेली अभिनेत्री जया भट्टाचार्य यांनी मुंबईच्या नायगाव परिसरातून पीडित दीड महिन्याच्या कुत्र्याच्या पिलाची सुटका केली आहे. मुक्या जीवाला न्याय मिळवून देण्यासाठी जया भट्टाचार्य पण सोशल मीडियावरील विशेष मोहिमेत सहभागी झाल्या आहेत. माणसाच्या तुलनेत अनेक मुक्या जीवांचे आयुष्य अवघ्या काही महिन्यांचे असते. ते त्यांच्या वेदना माणसाला समजतील अशा पद्धतीने बोलून व्यक्त करू शकत नाहीत. यामुळे ते स्वतःची बाजू मानवी न्यायालयात मांडू शकत नाहीत, म्हणून मुक्या जीवांना न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करत असल्याचे जया भट्टाचार्य यांनी सांगितले. कुत्र्यावरील अत्याचार प्रकरणी लवकर न्याय मिळावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.



जया भट्टाचार्य यांच्या नेतृत्वात सोशल मीडियावर कुत्र्याच्या पिलाला न्याय मिळवून देण्यासाठी विशेष मोहीम सुरू आहे.कुत्र्याच्या पिलाच्या तब्येतीबाबत जया भट्टाचार्य दररोज सोशल मीडियावर अपडेट देत आहेत. जया यांच्या पोस्टवर अनेक अभिनेते - अभिनेत्री यांनी प्रतिक्रिया देत विकृत कृत्य करणाऱ्या नराधमाला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी करायला सुरुवात केली आहे.
Comments
Add Comment