Tuesday, March 25, 2025
Homeताज्या घडामोडीKaun Banega Crorepati 16: पत्नी जया बच्चन यांच्याकडून पैसे मागतात अमिताभ बच्चन

Kaun Banega Crorepati 16: पत्नी जया बच्चन यांच्याकडून पैसे मागतात अमिताभ बच्चन

मुंबई: कौन बनेगा करोडपती १६(Kaun Banega Crorepati 16) हा रिअॅलिटी शो सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. या शोमध्ये अमिताभ बच्चन आपल्या खाजगी आयुष्यातील गोष्टीही शेअर करत असतात. अमिताभ बच्चन प्रेक्षकांचे खूप मनोरंजन करत असतात नुकतीच त्यांनी आपल्या पत्नीबद्दलची एक गोष्ट सांगितले.

जेव्हा एका स्पर्धकाने अमिताभ बच्चन यांच्या दररोज मिडल क्लास फॅमिलीच्या संबंधित प्रश्न विचारले तेव्हा अमिताभ यांनी मजेशीर उत्तरे दिली.

तुमचं घर एवढं मोठं आहे, रिमोट हरवलं तर ते कसं शोधता.”. या प्रश्नापासून सुरुवात झाली. शीघ्र विनोदासाठी प्रसिद्ध असलेले अमिताभ बच्चन म्हणाले, “मी थेट सेट टॉप बॉक्सजवळ जाऊन त्याद्वारे कंट्रोल करतो..”

पुढच्या संवादात स्पर्धकाने मध्यम वर्गीय कुटुंबासंबंधी आणखी प्रश्न विचारले. या प्रश्नांमुळे प्रश्नमंजुषेच्या या कार्यक्रमात हास्यकल्लोळ उडाला. प्रियंकाने विचारले, “सर, मध्यमवर्गीय कुटुंबात रिमोट हरवलं तर भांडणं होतात. तुमच्याकडेही असं होतं का?”.. अमिताभ बच्चन म्हणाले, “नही देवी जी… हमारे घर में ऐसा नही होता.. सोफें पर दोन तकिये होते है.. रिमोट उस में छुप जाता है.. बस वहीं ढुंढना पडता है..”

प्रियंकाने पुढचा प्रश्न विचारला, “मी ऑफिसमधून घरी जाते तेव्हा मम्मी सांगते, येताना कोथिंबीर आण.. जया मॅडम तुम्हालाही असं काही आणायला सांगतात का? ” अमिताभ बच्चन म्हणाले, ” हो सांगतात ना.. तुम्ही स्वत:ला घरी आणा..”

प्रियंकाने शेवटचा प्रश्न विचारला, “सर, एटीएममधून कॅश काढायची असताना तुम्ही कधी बॅलेन्स चेक केलंय का?” अमिताभ बच्चन यांनी तत्काळ उत्तर दिलं, “मी माझ्याकडे कॅश बाळगतच नाही.. आणि मी कधी एटीएममध्येही गेलो नाही. ते कसं वापरतात, हे मला कळत नाही. पण जयाजींकडे कॅश असते.मी त्यांनाच पैसे मागतो. जयाजींना गजरा खूप आवडतो. तर रस्त्यात मी लहान मुलाकडून गजरा विकत घेतो. तो गजरा कधी जयाजींना देतो तर कधी गाडीतच ठेवतो. कारण त्याचा सुगंध मला खूप आवडतो.. “

प्रियंकाचे खेळकर प्रश्न आणि मि. अमिताभ बच्चन यांची चपखल उत्तरं यामुळे हा एपिसोड विनोद आणि भावनिक क्षणांनी भारलेला ठरला. कौन बनेगा करोडपती हा कार्यक्रम कोट्यवधी लोकांना का आवडतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -