मुंबई : मत्स्य आणि बंदर खात्याचा पदभार मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी मंगळवारी स्वीकारला. या दरम्यान माध्यमांशी संवाद साधताना सुरक्षा अत्यंत महत्वाची आहे. २६/११ नंतर आपण बरीच खबरदारी घेतली. समुद्री किनाऱ्यावर राहणाऱ्या बांगलादेशींचाही बंदोबस्त करणार, असा इशारा मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी दिला आहे.
मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी मंगळवार, दि. २४ डिसेंबर रोजी मंत्रालयात आपल्या खात्याचा पदभार स्वीकारल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मत्स्य आणि बंदर खात्यातीतील विविध प्रश्नांवर भाष्य करत उपरोक्त इशारा दिला आहे. समुद्र किनारी रोहिंग्यो आणि बांगलादेशी यांचे वास्तव्य सहन करणार नाही, असेही ते म्हणाले.
मत्स्य आणि बंदरे दोन्ही खात्यांमध्ये काय सुरु आहे? आपण कुठून सुरुवात करायची? याचा मी आढावा घेतल्याचे नीतेश राणे यांनी सांगितले. माझ्या काही अपेक्षा किंवा विकासाच्या अनुषंगाने बदल करण्यासाठी काय करता येईल, यासाठी काही सूचना दिल्या, असेही नीतेश राणे यांनी सांगितले.
नितेश राणे यांनी पुढे बोलताना, रोहींग्यो आणि बांगलादेशींना इशारा दिला. सागरी सुरक्षा अत्यंत महत्वाची आहे. २६/११ च्या हल्ल्यानंतर आपण बरीच खबरदारी घेतली. मात्र आताही काही जिहादी लोकांच्या अॅक्टिव्हिटी सागरी किनाऱ्यावर काम करत असतात, असा दावा नितेश राणे यांनी केला. त्यामुळे त्यासाठी काय करता येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नितेश राणे म्हणाले.
रोहिंग्यो आणि बांगलादेशी यांचे वास्तव्य सहन करणार नाही, त्यांना सोडणार नाही. त्यांची सफाई मोहीम हाती घेऊ. समुद्र किनाऱ्यावर राहणाऱ्या बांगलादेशींचाही बंदोबस्त करणार, असा इशाराही नितेश राणे यांनी दिला.