नवी मुंबई : अपघातादरम्यान कारमधील ‘एअर बॅग’ उघडून फटका बसल्याने चिमुकल्याचा मृत्यू शनिवारी रात्री वाशीत झाल्याची घटना समोर आली आहे. संबंधित कार चालकाविरोधात वाशी पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे.
Singer Shaan’s Home : प्रसिद्ध गायक शानच्या राहत्या इमारतीत अग्नितांडव
वाशी सेक्टर-१५ मध्ये राहणारा मावजी अरेठीया (३५) शनिवारी ( दि. २१ ) रात्री वॅगन आर कारमधून आपला सहा वर्षीय मुलगा हर्ष व तीन पुतण्यांना घेऊन बाहेर पडला होता. ब्ल्यू डायमंड चौकात पुढच्या कारच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही कार रस्ता दुभाजकावर धडकली. तिचे मागचे चाक निखळून मावजी यांच्या गाडीवर आदळले. त्यामुळे वॅगनारच्या दोन्ही एअरबॅग उघडल्या. याचा हर्षला जोरात फटका बसून तो बेशुद्ध पडला. त्याला महापालिकेच्या रुग्णालयात नेले, मात्र त्याचा मृत्यू झाला.
दरम्यान, हर्षला कोणतीही बाह्य दुखापत झाली नाही. मानसिक धक्का आणि रक्तस्त्रावामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा डॉक्टरांचा संशय आहे. SUV ड्रायव्हर, कॉस्मेटिक सर्जन डॉ विनोद पाचाडे (४०) यांच्या विरोधात रॅश आणि निष्काळजीपणे ड्रायव्हिंग केल्याबद्दल एफआयआर दाखल करण्यात आला आहे.