मुंबई : प्रसिद्ध गायक शान राहत असलेल्या मुंबईतील निवासी इमारतीला मंगळवारी पहाटे आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. या आगीचा व्हिडिओही समोर आला आहे. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही.
Satish Wagh Murder Case : सतीश वाघ खून प्रकरणात आणखी एकाला अटक
मंगळवारी पहाटे वांद्रे पश्चिम परिसरात असणाऱ्या या फॉर्च्यून एन्क्लेव्ह या निवासी इमारतीच्या सातव्या मजल्यावर भीषण आग लागली होती. साधारण १.५० वाजता पहाटे ही आगीची घटना घडली. याच इमारतीच्या अकराव्या मजल्यावर बॉलिवूडचा प्रसिद्ध पार्श्वगायक शान वास्तव्यास आहे.
आग विझवण्यासाठी आणि फॉर्च्यून एन्क्लेव्हमधील रहिवाशांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन विभागाच्या १० गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. प्राथमिक तपासात शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. असे असले तरीही या आगीची घटना कशामुळे घडली याबद्दल अद्यापही अस्पष्टताच आहे.