Wednesday, March 26, 2025
Homeताज्या घडामोडीVande Bharat Express : अरे बापरे! जायचं होतं गोव्याला, पण पोहोचली कल्याणला

Vande Bharat Express : अरे बापरे! जायचं होतं गोव्याला, पण पोहोचली कल्याणला

वंदे भारत एक्स्प्रेस मार्ग भटकताच हडबडली रेल्वेची सुरक्षा यंत्रणा

मुंबई : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ते मडगावपर्यंत धावणारी देशातील आधुनिक ट्रेन वंदे भारत एक्स्प्रेस (Vande Bharat Express) महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात हरवली. दिवा स्थानकातून ही गाडी पनवेलकडे जाण्याऐवजी कल्याणच्या दिशेने वळली. दरम्यान मार्ग बदलल्याचे लक्षात येताच रेल्वेची सुरक्षा यंत्रणा हडबडली. दरम्यान ही गाडी घाईघाईने कल्याण स्थानकावर नेण्यात आली. तेथून काही वेळाने ही गाडी पुन्हा दिवा स्थानकात परतली आणि त्यानंतर पुढचा प्रवास सुरू ठेवला. या बिघाडामुळे ट्रेन ९० मिनिटे उशिराने पोहोचली.

रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही गाडी दिवा-पनवेल मार्गावर जाणार होती, जो कोकणात जाणाऱ्या गाड्यांसाठी नियुक्त मार्ग आहे. मात्र ही गाडी सकाळी ६:१०वाजता दिवा स्थानकाच्या पुढे कल्याणच्या दिशेने वळली. मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिग्नलमधील त्रुटीमुळे हा गोंधळ उघडकीस आला आहे. वास्तविक, दिवा जंक्शन येथे डाउन फास्ट लाईन आणि पाचव्या लाईन दरम्यान पॉइंट क्रमांक १०३ वर सिग्नलिंग आणि टेलिकम्युनिकेशन सिस्टममध्ये तांत्रिक बिघाड झाला.

मुख्यमंत्रीच ठरले चिटफंड घोटाळ्याचे बळी!

त्यामुळे मध्य रेल्वेच्या मुंबई लोकल ट्रेन सेवेवर मोठा परिणाम झाला आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही अनियमितता समोर आल्यानंतर ही गाडी कल्याण स्थानकात नेण्यात आली आणि काही वेळानंतर ही गाडी दिव्याला परत पाठवण्यात आली. दिवा येथे पोहोचल्यानंतर ही गाडी दिवा-पनवेल या निश्चित मार्गाने मडगावकडे रवाना झाली.

सुमारे ३५ मिनिटे थांबली होती ट्रेन

मुख्य जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वंदे भारत एक्सप्रेस दिवा जंक्शनवर सकाळी ६:१० ते ७:४५ या वेळेत सुमारे ३५ मिनिटे ट्रेन थांबवण्यात आली होती. ते म्हणाले की, गाडी पाचव्या मार्गाने सायंकाळी ७.०४ वाजता कल्याण स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक सहावर पोहोचली आणि सहाव्या मार्गाने सायंकाळी ७.१३ वाजता पुन्हा दिवा स्थानकात आणण्यात आली. वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन जून २०२३ मध्ये सीएसएमटी-मडगाव या मार्गावर सुरू करण्यात आली होती. नियोजित वेळापत्रकानुसार ही गाडी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलवरून पहाटे ५.२५ वाजता सुटते आणि त्याच दिवशी दुपारी १.१० वाजता गोव्यातील मडगावला पोहोचते. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मुंबई उपनगरीय स्वयंचलित सिग्नलिंग यंत्रणा जोरदार मजबूत आहे. त्यामुळे येथे अशा घटना फार कमी आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -