मुंबई : मलेशियात रंगणाऱ्या १९ वर्षांखालील महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. बीसीसीआयच्या महिला निवड समितीने आज मंगळवारी ही घोषणा केली.
भारताच्या या संघात तीन मराठी मुलींचा समावेश
१८ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत ही स्पर्धा मलेशियात खेळवली जाणार आहे. भारताच्या या संघात सानिका चाळके, भाविका अहिरे व इश्वरी अवसारे या तीन मराठी मुलींचा समावेश असणार आहे.
IND vs AUS: मेलबर्न कसोटीआधी भारतीय संघात मोठा फेरबदल, अश्विनच्या जागी या खेळाडूची एंट्री
आगामी अंडर १९ वूमन्स टी २० वर्ल्ड कप २०२५ स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआय निवड समितीने मुख्य संघात १५ खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. तर ३ खेळाडूंना राखीव म्हणून संधी देण्यात आली आहे.
अंडर १९ टी-२० वर्ल्ड कप २०२५ च्या स्पर्धेत निकी प्रसाद भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. याशिवाय सानिका चाळके हिच्याकडे उप कॅप्टन्सीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
नुकत्याच झालेल्या पहिल्या वहिल्या अंडर १९ आशिया कप स्पर्धेत भारतीय महिला संघानं बाजी मारली होती. या संघातील बहुतांश खेळाडूंना वर्ल्ड कपचं तिकीट मिळाले आहे. भारतीय संघात दोन विकेटकिपरच्या रुपात कमलिनी जी आणि भाविका अहिरे यांचा समावेश करण्यात आला आहे. तर नंदना एस हिच्या जागी वैष्णवी एसला टी-२० वर्ल्ड कप संघात स्थान देण्यात आले आहे.
दुसरीकडे नंदना हिला राखीव खेळाडूच्या यादीत ठेवण्यात आले आहे. या वूमन्स अंडर १९ वर्ल्ड कप २०२५ स्पर्धेत एकूण १६ संघ सहभागी होणार आहेत. या १६ संघांना ४-४ नुसार ४ गटात विभागण्यात आलं आहे.
टीम इंडियासह विंडीज, यजमान मलेशिया आणि श्रीलंका हे ४ संघ ए ग्रुपमध्ये आहेत.
टीम इंडिया वर्ल्ड कप मोहिमेची सुरुवात १९ जानेवारीला विंडीजविरूद्धच्या सामन्याने करणार आहे. त्यानंतर २१ जानेवारीला मलेशियाविरुद्ध सामना होईल. तर टीम इंडिया साखळी फेरीतील तिसरा आणि शेवटचा सामना हा २३ जानेवारीला श्रीलंकेविरुद्ध खेळेल.