मुंबई: भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. येथे बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी अंतर्गत यजमान संघाविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. दोन्ही संघादरम्यानची ही कसोटी मालिका सध्या १-१ अशा बरोबरीत आहे. आता कसोटी मालिकेतील चौथा सामना २६ डिसेंबरपासून मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडमध्ये खेळवला जात आहे.
मुंबईच्या या ऑलराऊंडरची एंट्री
मेलबर्न कसोटीआधी भारतीय संघाशी संबंधित बातमी समोर येत आहे. मुंबईच्या ऑलराऊंडर तनुष कोटियनला या मालिकेतील दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघात सामील केले आहे. २६ वर्षीय तनुष ऑफ स्पिन गोलंदाजी करतात. सोबतच तो चांगला गोलंदाज आहे. तनुषने रवीचंद्रन अश्विनची जागा घेतली आहे. अश्विनने गाबा कसोटीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा म्हटले होते.
तनुष कोटियनने २०१८-१९च्या रणजी हंगामाद्वारे फर्स्ट क्लास कसोटीत पदार्पण केले होते. कोटियनने आतापर्यंत ३३ प्रथम श्रेणी सामन्यात २५.७०च्या सरासरीने १०१ विकेट मिळवल्या आहेत. या दम्यान त्याने ३ वेळा पाच विकेट घेतल्या. बॅटिंगबाबत बोलायचे झाल्यास त्याने ४१.२१च्या सरासरीने १५२५ धावा केल्यात.
तनुष कोटियनने २० लिस्ट ए आणि ३३ टी-२० सामने खेळले आहेत. लिस्ट ए सामन्यात कोटियनच्या नावावर ४३.६० च्या सरासरीने २० विकेट मिळवल्यात.