मुंबई : लाडकी बहीण योजना विधानसभा निवडणुकीनंतर बंद होणार असल्याच्या चर्चा होत होत्या. मात्र आता या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हफ्ता आजपासून सुरु होणार आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ही योजना राबवण्यात आली आहे.
Weather : वर्षाअखेरीस राज्यात पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज
लाडकी बहीण योजनेच्या प्रतीक्षेत असलेल्या बहिणींच्या खात्यात आजपासून १५०० रुपये जमा होणार आहेत. या महिनाअखेर लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या प्रत्येक महिलेच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. निवडणुकीनंतर पहिल्या टप्प्यात ३५ लाख महिलांना या योजनेचा लाभ होणार असून मात्र आता लाडक्या बहिणींना प्रतीक्षा आहे २१०० रुपयांची.