मुंबई: प्रत्येक मोसमात लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलतात. थंडी येताच बरेचजण गरम पदार्थ खाण्यास सुरूवात करतात. चहा-कॉफीचे सेवन अधिक करू लागतात. तसेच पाण्याचे सेवन मात्र कमी होते. थंडीच्या दिवसांत तहान कमी लागते. याच कारणामुळे लोक आपल्या लिक्विड डाएटवर लक्ष देत नाहीत. थंडीच्या दिवसांत तहान कमी लागते याचा अर्थ शरीराला पाण्याची गरज नाही असे नाही तर या दिवसांतही शरीराला पाण्याची गरज असते. शरीरात पाण्याची कमतरता झाल्यास मेंदूच्या कोशिका आकुंचन पावू लागतात. यामुळे विचार करण्याच्या क्षमतेवरही परिणाम होतो.
कोरडी त्वचा: थंडीच्या दिवसांत पाणी कमी प्यायल्यास त्वचा कोरडी होऊ लागते. थंडीत त्वचा कोरडी होणे सामान्य बाब आहे. मात्र असे अनेकदा होते की त्वचेवर खपलीसारखी होते. हे मात्र पाणी कमी असण्याचे लक्षण आहे. जे लोक दीर्घकाळापासून पाणी कमी पितात त्यांची त्वचा रूक्ष असतात. थंडीच्या दिवसांत ही समस्या अधिक वाढते.
लघवी पिवळी होणे – जर लघवीचा रंग पिवळा असेल, कमी होत असेल अथवा लघवीजवळ जळजळ होत असेल तर समजून जा की शरीरात पाण्याची कमतरता आहे. कमी पाणी प्यायल्याने लगेचच लघवीवर परिणाम होतो.
तोंड सुकणे – जर तुमचे ओठ खूप कोरडे पडत असतील. सतत सुकत असतील अथवा घसा सुकत असेल तर तुम्हाला पाण्याची कमतरता जाणवते. जर तोंड सतत सुकत असेल तर समजून जा की शरीरात पाण्याची कमतरता आहे.
हृदयाकडे जडपणा – दीर्घकाळापासून तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता असेल तर रक्ताच्या प्रमाणावरही परिणााम होतो. अशातच हृदयाला रक्ताचा पुरवठा करण्यासाठी अधिक मेहनत करावी लागते. यामुळे हृदयावर जोर पडतो.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,…
ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार मुंबई (प्रतिनिधी) : बनावट पनीर किंवा चीन ऍनालॉग वापरणाऱ्यांवर…
पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…
काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…