Thursday, March 20, 2025
Homeक्रीडासामना पाहण्यासाठी आलेल्या महिलेने स्टेडियममध्ये दिला बाळाला जन्म

सामना पाहण्यासाठी आलेल्या महिलेने स्टेडियममध्ये दिला बाळाला जन्म

नवी दिल्ली : तिसऱ्या वनडे सामन्यात (Pakistan vs South Africa) दक्षिण आफ्रिकेच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यादरम्यान पाकिस्तानच्या डावात स्टेडियममध्ये लावण्यात आलेल्या स्क्रीनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. नवजात बाळाच्या जन्माची आनंदाची बातमी या स्क्रीनवर शेअर करण्यात आली होती. मिस्टर आणि मिसेस राबेंग तुमच्या बाळाच्या जन्मासाठी तुमचे अभिनंदन. या सामन्यादरम्यान राबेंग यांनी वाँडरर्स स्टेडियमच्या मेडिकल सेंटरमध्ये मुलाला जन्म दिला.

पाकिस्तान-आफ्रिका सामन्यादरम्यान मुलाच्या जन्मासह अजून एक खास प्रसंग पाहायला मिळाला. एका चाहत्याने आपल्या गर्लफ्रेंडला मॅचदरम्यान लग्नासाठी प्रपोज केलं, त्यानंतर या व्यक्तीने गुडघ्यावर बसत गर्लफ्रेंडला अंगठी घातली. दक्षिण आफ्रिकन क्रिकेट बोर्डानेही या जोडप्याचे अभिनंदन केले आणि काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले.

Vinod Kambli : विनोद कांबळीची प्रकृती पुन्हा खालावली, रुग्णालयात दाखल

तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून पाकिस्तान संघाने २-० अशी अभेद्य आघाडी घेतली होती. त्याचवेळी तिसऱ्या सामन्यातही पाकिस्तानच्या फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने ४७ षटकांत ९ गडी गमावून ३०८ धावा केल्या. या मालिकेत सय्यम अयुबने आणखी एक शतक झळकावले. त्याने ९४ चेंडूत १०१ धावांची खेळी केली. तर, मोहम्मद रिझवान आणि बाबर आझम यांनी अर्धशतकं झळकावली. पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेला ३-० ने वनडे मालिकेत नमवत निर्भेळ मालिका विजय नोंदवला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -