ठाणे : भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू विनोद कांबळी (Vinod Kambli) याची प्रकृती पुन्हा एकदा खालावली आहे. त्याला ठाणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. विनोद कांबळीची काळजी घेण्यासाठी डॉक्टरांचे पथक कार्यरत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कांबळीची प्रकृती सध्या स्थिर आहे.
In pictures: Cricketer Vinod Kambli’s condition deteriorated again, leading to his admission at Akriti Hospital in Thane late Saturday night. His condition is now stable but remains critical. pic.twitter.com/7NBektzQ54
— IANS (@ians_india) December 23, 2024
काही दिवसापूर्वी रमाकांत आचरेकर स्मारकाच्या उद्घाटन कार्यक्रमाला विनोद कांबळी उपस्थित होता. या कार्यक्रमाला सचिनही उपस्थित होता. सचिन आणि कांबळीचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप चर्चेत होता. कांबळी हा गंभीर आजाराने त्रस्त आहे. त्याच्या व्यसनाधीनतेमुळे त्याला खूप त्रास होत आहे. यासाठी तो अनेकवेळा पुनर्वसन केंद्रातही गेला आहे.
हृदयविकारासोबतच कांबळी इतर समस्यांमधूनही जात आहे. यापूर्वीही त्याची प्रकृती खालावली होती. आता पुन्हा एकदा त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या तो डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. जर सर्व काही ठीक झाले तर त्याला लवकरच डिस्चार्ज मिळेल. मात्र याबाबत अधिकृत माहिती अद्याप आली नाही.