ब्राझीलिया : ब्राझीलच्या ग्रामाडो शहरात एक छोटे प्रवासी विमान कोसळल्याची माहिती समोर येत आहे.या विमान अपघातात १० जणांचा मृत्यू झाला आहे.तर १५ जण जखमी झाले आहेत. दरम्यान, अपघातग्रस्त विमानात प्रवास करणाऱ्या सर्वच प्रवाशांचा यात मृत्यू झाला आहे अशी प्राथमिक माहिती आली आहे. हा अपघात रविवारी झाला असल्याचे म्हटले जात आहे.
PM Rojgar Mela 2024 : पंतप्रधानांच्या हस्ते ७१ हजार तरुणांना नियुक्ती पत्रांचे वाटप
माहितीनुसार, “विमान प्रथम एका इमारतीच्या चिमणीला धडकले आणि त्याच इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर कोसळले. यानंतर जवळच असलेल्या फर्निचरच्या दुकानात भीषण अपघात झाला. एरिया गव्हर्नर एडुआर्डो लेइट यांनी या अपघाताविषयी माहिती दिली आहे. त्यांनी यासाठी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे.आपत्कालीन दल सध्या घटनास्थळी बचाव कार्यात गुंतले आहे.” असे त्यांनी म्हटले. दरम्यान, विमानातील एकही प्रवासी जिवंत नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. राज्य सार्वजनिक सुरक्षा कार्यालयाच्या म्हणण्यानुसार, किमान १५ लोकांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
A small plane crashes after pilot and passenger eject.
10 people killed, 15 injured in Brazil plane crash. #Brazil #PlaneCrash pic.twitter.com/7xKzwTrZyC— The Frustrated Indian (@FrustIndian) December 23, 2024
स्थानिक माध्यमातील माहितीनुसार, विमान पाइपर चेयेन ४०० टर्बोप्रॉप होते. ग्रामाडोहून कॅनेला शहराकडे उड्डाण केले. ते ख्रिसमससाठी फ्लोरियानोपोलिस या प्रसिद्ध पर्यटनस्थळी जात होते. ग्रामाडो हे ब्राझीलमधील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. हे डोंगराळ भागात वसलेले असून येथे दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक येतात. ख्रिसमसच्या काही दिवस आधी हा अपघात झाला.या विमान अपघातानंतर स्फोटाचा आवाज आला आणि आग लागली.