Sunday, November 2, 2025
Happy Diwali

Sheikh Hasina : ‘शेख हसीना यांना बांगलादेशला परत पाठवा’

Sheikh Hasina : ‘शेख हसीना यांना बांगलादेशला परत पाठवा’
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतात आश्रय घेतलेल्या बांगलादेशच्या पदच्युत पंतप्रधान पंतप्रधान शेख हसीना यांविरुद्ध कायदेशीर कारवाई होणार आहे. त्यामुळे भारताने त्यांना बांगला देशकडे सोपवावे, अशी मागणी बांगला देशचे परराष्ट्र मंत्री तौहीद हुसेन यांनी माध्यमांशी बोलताना केली. तसेच यासंदर्भात भारताशी पत्र व्यवहारही करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
शेख हसीना यांनी बांगलादेशमधील अस्थिर राजकीय परिस्थितीमुळे ५ ऑगस्ट २०२५ रोजी भारतात आश्रय घेतला. तब्बल १६ वर्षांची त्यांची राजवट संपुष्टात आली. ढाकास्थित आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने शेख हसीना आणि अनेक माजी कॅबिनेट मंत्री, सल्लागार आणि लष्करी आणि नागरी अधिकाऱ्यांवर अटक वॉरंट जारी केले आहे. परराष्ट्रमंत्री तौहीद हुसेन यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, शेख हसीना यांना बांगला देशकडे सुपूर्द करावे, अशी मागणी आम्ही भारत सरकारला संदेश पाठवून केली आहे. आम्ही शेख हसीना यांच्या प्रत्यार्पणाबाबत परराष्ट्र मंत्रालयाला पत्र पाठवले आहे. ही प्रक्रिया सध्या सुरू आहे. ढाका आणि नवी दिल्ली यांच्यात प्रत्यार्पण करार अस्तित्वात आहे. या करारानुसार हसीना यांना बांगलादेशात परत आणले जाऊ शकते.
Comments
Add Comment