मुंबई : दिग्दर्शक आदित्य धर एका नवीन चित्रपटावर काम करत आहे. यात रणवीर सिंग, अक्षय खन्ना, आर माधवन आणि अर्जुन रामपाल यांच्या महत्वाच्या भूमिका पाहायला मिळणार आहेत. हा चित्रपट ॲक्शनने भरलेला असणार आहे. आता याच संबंधित एक रंजक माहिती समोर आली आहे. या चित्रपटाचे शीर्षक समोर आले आहे. वास्तविक, या चित्रपटाचे अमृतसरमध्ये शूटिंग शेड्यूल पूर्ण झाले आहे. अभिनेते राकेश बेदी यांनी ही माहिती स्वतः शेअर केली आहे. यासोबतच त्याने केक कापतानाचा एक फोटोसुद्धा पोस्ट केला आहे, ज्यामध्ये चित्रपटाचे शीर्षक लिहिले आहे.
आगामी चित्रपटाचे नाव काय?
आदित्य धरच्या या ॲक्शन चित्रपटाचे नाव ‘धुरंधर’ आहे. हे केकवर लिहिलेले नाव आहे. यासोबतच शूटिंग पूर्ण झाल्याची माहितीही देण्यात आली आहे. केकवर रणवीर सिंग, आर माधवन, अक्षय खन्ना, राकेश बेदी, संजय दत्त आणि अर्जुन रामपाल यांचेदेखील फोटो दिसत आहेत. अमृतसरमध्ये या चित्रपटाचं शूटिंग जवळपास महिनाभर चालले आहे.
Paatal Lok Season 2 : पाताल लोक २ ‘या’ तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
पुढच्या वर्षी हा चित्रपट झळकणार
अभिनेता राकेश बेदी देखील या चित्रपटाचा एक भाग असणार आहेत. पोस्टसोबत कस्टम केकचा फोटो शेअर करताना त्यांनी लिहिलं की, ‘अमृतसरमधील ‘धुरंधर’ चित्रपटाचे महिन्याभराचे शेड्यूल पूर्ण झालेल आहे. या चित्रपटाची निर्मिती आदित्य धर करत असून ते दिग्दर्शनही करत आहेत. ‘धुरंधर’ हा एक ॲक्शन थ्रिलर चित्रपट आहे. हा चित्रपट पुढील वर्षी तगड्या टीमसोबत मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. याबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. या चित्रपटामध्ये दमदार बॉलीवूडचे अभिनेते एकत्र काम करताना दिसणार आहेत.
View this post on Instagram
नुकतंच सुवर्ण मंदिराला भेट दिली
नुकतंच या चित्रपटाच्या स्टार कास्टने अमृतसरच्या शूटिंगदरम्यान सुवर्ण मंदिरालाही भेट दिली होती. यादरम्यान चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य धर, यामी गौतम त्यांचा मुलगा वेदविदसोबत दिसले. संजय दत्तसोबत रणवीर सिंगही सुवर्ण मंदिरात दर्शनासाठी पोहोचले. या चित्रपटात यामी गौतमचीही महत्त्वाची भूमिका असल्याची बातमी आहे. एवढी तगडी स्टार कास्ट पाहून चाहत्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.