मुंबई : अॅमेझॉन प्राइम व्हीडिओवर २०२० मध्ये ओटीटी प्लॅटफॉर्म ‘पाताल लोक’ वेबसीरिज लाँच झाली होती. लॉकडाउनमध्ये रिलीज झालेल्या या ‘पाताल लोक’ वेबसीरिजने प्रेक्षकांचं चांगलंच प्रेम मिळवलं होत. तेव्हापासूनच या सीरिजचा दुसरा सीझन कधी सुरू होणार याबाबत सातत्याने प्रेक्षकांकडून विचारणा केली जात होती.आता ४ वर्षांनी प्रेक्षकांची प्रतिक्षा संपणार आहे. काही दिवसांपूर्वीच सीरिजच्या सीझन २ चा प्रोमो समोर आला होता. आता पाताल लोक २ च्या रिलीजची अधिकृत तारीख समोर आली आहे.
‘पाताल लोक २’ ही वेबसीरिज १७ जानेवारी २०२५ ला रिलीज होणार आहे.’नवीन वर्षात दरवाजे उघडणार..’ अशी टॅगलाइन देत प्राइम व्हिडीओने त्यांच्या सोशल मीडियावर ‘पाताल लोक २’च्या रिलीज डेटची घोषणा केली आहे.पहिल्या सीझनप्रमाणेच हा दुसरा सीझन देखील प्राइम व्हीडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. पहिल्या सीझनप्रमाणे ‘पाताल लोक २’चं दिग्दर्शन सुद्धा अविनाश अरुण यांनी केलंय.पहिल्या सीझनमध्ये जयदीप अहलावत, इश्वाक सिंग आणि अभिषेक बॅनर्जी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. सीरिजच्या पहिल्या सीझनमध्ये जयदीप अहलावत यांनी इन्स्पेक्टर हातीराम चौधरी आणि इश्वाक सिंग यांनी कॉन्स्टेबल अन्सारी यांची भूमिका साकारली होती. दुसऱ्या सीझनमध्ये या कलाकारांसोबतच तिलोत्तमा शोम, नागेश कुकुनूर आणि जाह्नू बरुआ सारखे नवीन चेहरे देखील दिसणार आहेत.
View this post on Instagram
पहिल्या सीझनला प्रेक्षकांसह समीक्षकांची देखील दाद मिळाली होती. याशिवाय, सीरिजला अनेक पुरस्कारही मिळाले होते. पहिल्या सीझन एकूण ९ भागांमध्ये रिलीज झाला होता. त्यामुळे दुसऱ्या सीझनमध्ये देखील ९ भाग असण्याची शक्यता आहे. दुसऱ्या सीझनचे दिग्दर्शन अविनाश अरुण धावरे यांनी केले आहे. प्रेक्षक आता या सीरिजच्या ट्रेलरची मागणी करत असून, १७ जानेवारीला येणाऱ्या दुसऱ्या सीझनमध्ये नवीन काय पाहायला मिळेल, याची उत्सुकता आहे.