Monday, May 12, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

Rain Alerts : राज्यात गुरुवार आणि शुक्रवारी पावसाचा इशारा

Rain Alerts : राज्यात गुरुवार आणि शुक्रवारी पावसाचा इशारा

मुंबई : उत्तर भारतातून येणारे थंड वारे अन् दक्षिण भारतातून येणारे बाष्पयुक्त वाऱ्याच्या प्रभावामुळे ऐन थंडीत राज्यात पर्जन्यस्थिती (Rain Alerts) निर्माण झाली आहे. दरम्यान गुरूवार २६ आणि शुक्रवार २७ डिसेंबर रोजी राज्यातील बहुतांशी भागात पावसाची शक्यता असल्याचे भारतीय हवामान विभागाने म्हटल्याचे वृत्त पुणे हवामान विभागाचे विभागप्रमुख डॉ. के. एस. होसाळीकर यांनी दिले आहे.


डॉ. होसाळीकर यांनी एक्स पोस्ट केली आहे. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, गुरूवार २६ आणि शुक्रवार २७ डिसेंबर रोजी राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.



गुरूवारी (दि.२६) धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक तर शुक्रवारी (दि.२७) अहिल्यानगर, छत्रपती संभाजी नगर, पुणे, जालना, बीड, परभणी, हिंगोली, अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशीम या जिल्ह्यात हवामान विभागाने पावसाचा इशारा दिला आहे.

Comments
Add Comment