
पुढील महिन्यात सुरु होणार या दोन नवीन ट्रेन
नवी दिल्ली : देशात सेमी हायस्पीड असलेली वंदे भारत ट्रेन प्रवाशांच्या पसंतीला उतरली. या ट्रेनची मागणी वाढत असताना रेल्वेकडून आणखी दोन वेगळ्या ट्रेन सुरु करण्यात येणार आहे. या ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्यांना हिवाळ्यातील थंडीचा त्रास होणार नाही. या ट्रेन पुढील महिन्यापासून सुरु होणार आहेत. सेंट्रली हिटेड स्लीपर ट्रेन असे त्या ट्रेनचे नाव असून नवी दिल्ली ते काश्मीर असा प्रवास या ट्रेन करणार आहेत.
काश्मीरात जाणा-या या दोन्ही ट्रेनमध्ये जबरदस्त सुविधा प्रवाशांना मिळणार आहे. त्यात गरम हवेपासून गरम पाणीपर्यंत सुविधा दिली जाणार आहे. यामुळे काश्मीरच्या थंड वातावरणात उबदार वातावरण रेल्वे प्रवाशांना मिळणार आहे.
अधिकाऱ्याने सांगितले की, लोको पायलटसाठी पुढील काच खास एम्बेडेड हिटिंग एलिमेंटसह डिझाइन करण्यात आली आहे. भारतीय रेल्वेमध्ये पहिल्यांदाच या तंत्राचा वापर करण्यात आला आहे. तापमान शून्य अंशांच्या खाली गेले तरी समोरच्या काचेवर बर्फ तयार होणार नाही.
पहिली ट्रेन नवी दिल्ली ते श्रीनगर दरम्यान धावणार आहे. ही ट्रेन सुरु झाल्यामुळे जम्मू ते श्रीनगर जाण्यासाठी आता वेगळी ट्रेन बदलावी लागणार नाही. ही ट्रेन दिल्ली ते श्रीनगर हे अंतर १३ तासांत पूर्ण करणार आहे. ही ट्रेन ३५९ मीटर उंच चेनाब पुलावरुन जाणार आहे.

नवी दिल्ली : कुवैत दौऱ्यावरून परतताच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७१ हजारांहून अधिक तरुणांना नियुक्तीपत्रांचे वितरण केले. भारतातील तरुणांची ...
दुसरी ट्रेन आठ कोचची असणार आहे. ही ट्रेन टेअर कार सीटींगची असणार आहे. कटरा आणि बारामुल्ला दरम्यान ही रेल्वे धावणार आहे. कटरा आणि बारामुल्ला हे २४६ किलोमीटरचे अंतर ही रेल्वे केवळ दहा तासांत पूर्ण करणार आहे. त्यासाठी फक्त साडे तीन तास लागणार आहेत. बसने हा प्रवास १० तासांचा आहे.
सेंट्रली हिटेड स्लीपर ट्रेनमध्ये विशेष सुविधांचाही समावेश आहे. त्यात पाण्याच्या टाक्यांसाठी सिलिकॉन हिटिंग पॅड असणार आहे. त्यामुळे थंडीपासून संरक्षण होईल. या परिस्थितीत प्रवाशांना ट्रेनमध्ये गरम पाणी मिळणार आहे. या ट्रेनच्या टॉयलेटसाठी डक्ट खास डिझाईन करण्यात आला आहे. जेणेकरून त्यात गरम हवा येत राहते.