मुंबई: प्रत्येक भारतीय किचनमध्ये कुकर हा असतोच. कुकरशिवाय अनेकांचे जेवण पूर्ण होत नाही.कुकरच्या ३ शिट्ट्या झाल्यावर जेवण पूर्ण झाल्याचे समजते. डाळ भात म्हटला की कुकर आठवतो. एकाच कुकरमध्ये डाळ आणि भात शिजवता येतो. झटपट जेवण करायचे असेल कुकरचा वापर होतो.
किचनमधील महत्त्वाचा घटक हा कुकर असतो. जेवण बनवता येण्याची पहिली स्टेप म्हणजे कुकर लावता येणे होय. तुम्हाला कुकर लावता आला म्हणजे तुम्हाला जेवण बनवता येते असे समजले जाते. मात्र कुकर जितका झटपट होणारा तसेच तो तितकाच हाताळण्यासाठी कठीण. कुकर लावताना एक छोटीशी चूक गंभीर दुर्घटनेचे कारण बनू शकते.
जेवण बनवताना कुकर पूर्णपणे भरू नये तसेच पाण्याचे प्रमाण योग्य ठेवावे. कुकर अधिक भरल्याने दबाव वाढू शकतो. यामुळे कुकर फुटण्याचा धोका वाढू शकतो. कुकरची रबर रिंग खराब झाल्यास लगेचच बदला. कारण रबरची रिंग खराब झाल्यास योग्य दबाव बनत नाही.
कुकरची शिट्टीमध्ये जर जेवण अडकले तर पाण्यात भिजवून शिट्टी साफ करा. कुकरमध्ये पाणीचे प्रमाण खूप कमी नाही असले पाहिजे. पाणी कमी असल्यास वाफ अधिक बनेल यामुळे कुकर फुटण्याचा धोका अधिक असतो.