Wednesday, March 19, 2025
Homeताज्या घडामोडीEknathShinde : 'डेडिकेटेड टू कॉमन मॅन' पुस्तिकेचे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन

EknathShinde : ‘डेडिकेटेड टू कॉमन मॅन’ पुस्तिकेचे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन

नागपूर : महाराष्ट्र राज्याचे गेली सव्वा दोन वर्ष कर्तव्यनिष्ठ आणि लोकप्रिय मुख्यमंत्री राहिलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदावरील कारकिर्दीचा लेखाजोखा मांडण्यात आलेल्या डेडिकेटेड टू कॉमन मॅन या छोटेखानी कॉफी टेबल बुक चे प्रकाशन नागपूर विधान भवन येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुस्तकाच्या सुबक आणि सुटसुटीत मांडणी बद्दल समाधान व्यक्त केले तसेच पुढील भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वीय सहाय्यक प्रभाकर काळे, महायुती सरकारमधील कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोगावले, ज्येष्ठ कॅबिनेट मंत्री संजय राठोड , सावंतवाडीचे आमदार व माजी मंत्री दीपक केसरकर, मुख्यमंत्री वैद्यकीय पक्षाचे माजी प्रमुख मंगेश चिवटे , शिवसेनेचे प्रवक्ते व युवा सेनेचे प्रमुख पदाधिकारी राहुल लोंढे , तरुण भारतचे मुंबई ब्यूरो चीफ प्रवीण काळे आदी उपस्थित होते .

Pooja Khedkar : पूजा खेडकरला लवकरच अटक होणार?

एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी घेतलेले जनता भिमुख लोकप्रिय निर्णय, या निर्णयांचा राज्यातील जनतेवर झालेला सकारात्मक परिणाम आणि यामुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीला रेकॉर्ड ब्रेक यश मिळाले आणि त्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रात भाजप- शिवसेना – राष्ट्रवादी आदी घटक पक्षांची पुन्हा प्रचंड बहुमताची सत्ता आली. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून राज्यात अभूतपूर्व प्रतिसाद लाभलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असो की बळीराजा कृषी पंप विज बिल सवलत योजना असो , टोलमाफीचा मास्टर स्ट्रोक असो , एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या एकापाठोपाठ एक अशा लोकप्रिय , धडाकेबाज निर्णयामुळे गेल्या काही दशकातील सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचा सातत्याने उल्लेख होत राहिला.

डेडिकेटेड टू कॉमन मॅन या छोटेखानी कॉपीटेबल बुक मध्ये एकनाथ शिंदे यांच्या अशाच लोकप्रिय आणि धडाकेबाज निर्णयांवर प्रकाशझोत टाकण्यात आला असून त्यांच्या राजकीय कारकीर्दीचा आलेख ही मांडण्यात आला आहे. ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि वरिष्ठ पत्रकार राजेश कोचरेकर , विधिमंडळातील ज्येष्ठ पत्रकार आणि अभासू विश्लेषक किशोर आपटे या दोघांचे अमूल्य व भरीव योगदान या उपक्रमामध्ये आहे. पुस्तकाची संकल्पना , निर्मिती आणि संपादन जेष्ठ पत्रकार सुनील जावडेकर यांनी केले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -