मुंबई : महायुती सरकारच्या मंत्र्यांना खातेवाटप केल्यानंतर आता बंगल्यांचे देखील वाटप (Allotment of bungalow) करण्यात आले आहे.
महसूल मंत्री चंद्रशेखर बाबनकुळे यांना रामटेक हा बंगला देण्यात आला आहे. तर पंकजा मुंडे यांना पर्णकुटी हा बंगला देण्यात आला आहे.
राधाकृष्ण विखे पाटील यांना रॉयल स्टोन हा बंगला देण्यात आलेला आहे. शंभूराज देसाई यांना मेघदूत तर गणेश नाईक यांना पावनगड हा बंगला देण्यात आला असून हसन मुश्रीफ यांना विशाळगड, चंद्रकांत पाटील यांना ब एक सिंहगड, गिरीश महाजन यांना सेवा सदन, गुलाबराव पाटील यांना जेतवन हा बंगला देण्यात आला आहे.
Jaishankar US Visit : परराष्ट्रमंत्र्यांच्या अमेरिका दौऱ्यात बांगलादेशवर होणार चर्चा ?
जयकुमार रावल यांना चित्रकूट तर अतुल सावे यांना शिवगड हा बंगला देण्यात आलेला आहे.
आशिष शेलार यांना रत्नसिंधू, दत्तात्रय भरणे यांना सिद्धगड, तर अदिती तटकरे यांना प्रतापगड, शिवेंद्र राजे भोसले यांना पन्हाळगड, माणिकराव कोकाटे यांना अंबर, जयकुमार गोरे यांना प्रचितीगड, नरहरी झिरवाळ यांना सुरुची, संजय सावकार यांना अंबर ३२ तर संजय शिरसाट यांना अंबर ३८ हा बंगला देण्यात आला आहे.
उदय सामंतांना मुक्तागिरी तर धनंजय मुंडे यांना सातपुडा हा बंगला देण्यात आला आहे. संजय राठोड यांना शिवनेरी बंगला, गणेश नाईक यांना पावनगड, दादा भुसे यांना ब तीन जंजिरा हा बंगला देण्यात आला आहे.
ज्ञानेश्वरी- सभापती, विधान परिषद राम शिंदे
शिवगिरी- अध्यक्ष विधानसभा, राहुल नावेकर
रामटेक- चंद्रशेखर बावनकुळे
पाटील रॉयलस्टोन- राधाकृष्ण विखे
विशाळगड(क-८)- हसन मुश्रीफ ,
सिहगड (ब-१) चंद्रकांतदादा पाटील
सेवासदन -गिरीश महाजन,
जेतवन-गुलाबराव पाटील
पावनगड (ब-४)- गणेश नाईक
जंजीरा (ब-३)- दादा भुसे
शिवनेरी-संजय राठोड
सातपुडा- धनंजय मुंडे
विजयदुर्ग (ब-५) मंगलप्रभात लोढा
मुक्तागिरी- उदय सामंत
चित्रकूट- जयकुमार रावल
पर्णकुटी-पंकजा मुंडे
शिवगढ़(अ-३)- अतुल सावे
लोहगड (अ-९)- अशोक उईके
मेघदूत- शंभूराजे देसाई
रत्नसिषु (व-२) – आशिष शेलार
सिध्दगड (ब-६)- दत्तात्रय भरणे
प्रतापगड (अ-५) अदिती तटकरे
पन्हाळगड (३-७)- शिवेंद्रराजे भोसले
अंबर-२७-माणिकराव कोकाटे
प्रचितीगड (क-६)- जयकुमार गोरे
सुरुचि -९-नरहरि झिरवाळ
अंबर-३२-संजय सावकारे
अंबर-३८-संजय शिरसाठ
अर्वतो-५- प्रताप सरनाईक
सुरुचि-२-भरत गोगावले
सुरुचि-३-मकरंद पाटील