Kalyan Dombivli : लंडनहून अँटी रेबीज लसीकरणासाठी टीम कल्याण डोंबिवलीत दाखल

डोंबिवली : कल्याण पूर्व मध्ये रेबीजमुळे पहिलाच मानवी मृत्यू गेल्या 20 वर्षांत झाल्यामुळे डोंबिवली येथील पॉज संस्था आणि लंडनमधील वर्ल्ड वाईड व्हेटरनरी सर्व्हिसेस तर्फे भटक्या श्वानाना मोफत अँटीरेबीज लसीकरण करण्यात आले. सुमारे 140 भटक्या जनावरांना ही अँटी रेबीज ची लस देण्यात आली. डोंबिवली, ठाकुर्ली, कल्याण, उल्हासनगर, आणि अंबरनाथ शहरात सदर मोहिम राबवण्यात आली असे पॉज संस्थेचे संस्थापक डॉ. निलेश भणगे यांनी सांगितले.



शहरात भटक्‍या कुत्र्यांची संख्या वाढत असून, त्यांना रेबीजची लागण होण्याची शक्‍यता आहे. याचा मानवी आरोग्यालाही धोका संभवतो. पॉज'तर्फे दर वर्षी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून रेबीज लसीकरण मोहीम घेतली जाते. ठाणे शहरासह उपनगरात भटक्‍या कुत्र्यांचे प्रमाण वाढले आहे. रेबीज झालेला कुत्रा माणसाला चावल्यास त्याचा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे शहरी कुत्र्यांना अँटी रेबीज लस देण्याचा उपक्रम पॉजने मागील एकवीस वर्षांपासून सुरू केला. विविध पालिकांकडून कुत्र्यांचे निर्बीजीकरण केले जाते. त्याचवेळी त्यांचे लसीकरण करण्यात येते. मात्र, भटक्‍या कुत्र्यांचे लसीकरणच होत नसल्याने त्यांच्यासह परिसरातील सर्वसामान्यांच्या जीवालाही धोका निर्माण होतो. त्यामुळेच ही विशेष रेबीजविरोधी मोहीम हाती घेण्यात आली.


नुकतीच रेबीजमुळे एक मानवी मृत्यू झाल्याची घटना झाली. त्यामुळे जागतिक संघटनानी याची दखल घेऊन मोठ्या प्रमाणात रेबीज प्रतिबंधक लस ही भटक्या श्वानाना देण्यात येईल असे जाहीर केले. त्याप्रमाणे रस्त्यावरील भटक्‍या कुत्र्यांसह इतर प्राण्यांना रेबीजसारख्या आजारांची लागण होते. यासाठी प्लॅन्ट ऍन्ड ऍनिमल वेल्फेअर सोसायटी (पॉज)ने लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. पॉज संस्थेचे ओंकार साळुंखे आणि लंडनच्या वर्ल्ड वाईड व्हेटरनरी सर्व्हिसचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विन आणि राज गुप्ता यांच्या साथीने विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात आली.

Comments
Add Comment

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

जगभरात लोकप्रिय ‘रेडिओ सिलोन’ची शताब्दी

‘बिनाका गीतमाला’सह गाजलेले अनेक कार्यक्रम कोलंबो : भारतीय चित्रपट संगीताच्या इतिहासात अजरामर ठरलेल्या ‘रेडिओ

विरार-अलिबाग प्रकल्पाला येणार गती

हुडकोकडून २२ हजार ५०० कोटींचे कर्ज उपलब्ध मुंबई : विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या प्रकल्पाला आता गती

जागतिक बाजारपेठेत भारतीय डाळिंबांची मागणी

मुंबई : राज्यातील शेतकरी निर्यातक्षम फळे व भाजीपाला पिकवतात. या उत्पादनांना स्पर्धात्मक दर मिळावा म्हणून

भारताचे अंतराळवीर चंद्रावर जाणार

मुंबई : आर्यभट्ट या पहिल्या भारतीय उपग्रहाच्या प्रक्षेपणापासून ते चांद्रयान ३ मोहीमेपर्यंत भारताने उपग्रह,

३ इडियट्सचे १६ वर्षे: ५ कारणे ज्यामुळे राजकुमार हिरानींचा 'हा' चित्रपट आजही तितकाच ताजा वाटतो

मुंबई : राजकुमार हिरानी हे मोजक्या अशा फिल्ममेकर्सपैकी आहेत, ज्यांच्या कथा केवळ मनोरंजन करत नाहीत, तर दीर्घकाळ