Friday, May 9, 2025

महामुंबईताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजक्राईम

Kalyan Crime : कल्याणमध्ये परप्रांतीयांची दादागिरी सुरुच! चिमुकलीसोबत अश्लील चाळे करणाऱ्याला जाब विचारल्यामुळे मराठी कुटुंबाला मारहाण

Kalyan Crime : कल्याणमध्ये परप्रांतीयांची दादागिरी सुरुच! चिमुकलीसोबत अश्लील चाळे करणाऱ्याला जाब विचारल्यामुळे मराठी कुटुंबाला मारहाण

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून कल्याणमध्ये एका परप्रांतियांनी मराठी कुटुंबाला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. त्यानंतर पोलिसांनी आरोपींवर कारवाई केली होती. मात्र कल्याणमध्ये अजूनही परप्रांतीयांची दादागिरी सुरुच असल्याचे दिसून येत आहे. चिमुकलीसोबत अश्लील चाळे करणाऱ्याला मराठी कुटुंबातील माणसांनी जाब विचारल्यामुळे मारहाण केली आहे. (Kalyan Crime)



मराठी कुटुंबातील चार वर्षीय मुलीशी अश्लील चाळे केल्याची माहिती चिमुकलीच्या कुटुंबियांना समजल्यानंतर त्यांनी जाब विचारण्यास सुरुवात केली. मात्र, जाब विचारण्यास गेलेल्या कुटुंबास उत्तम पांडे आणि त्याच्या पत्नीकडून जबर मारहाण करण्यात आली आहे. मारहाणीत मराठी तरुण जखमी झाला आहे तर तरुणाच्या पत्नीला व आईला देखील मारहाण करण्यात आली आहे. याशिवाय यामध्ये पोलीस कर्मचारी सुद्धा जखमी झाले आहेत.


उत्तम पांडे असे मारहाण करणाऱ्या आरोपीचे नाव असून त्याच्या पत्नीने देखील मारहाण केली आहे. या प्रकरणी पांडे पती पत्नी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आला आहे. (Kalyan Crime)

Comments
Add Comment