Sunday, July 6, 2025

Vitthalpuja : विठ्ठलपूजेचे बुकिंग १ जानेवारीपासून

Vitthalpuja : विठ्ठलपूजेचे बुकिंग १ जानेवारीपासून

सोलापूर : सावळ्या विठुरायाची पूजा करण्यासाठीची हजारो भाविकांची प्रतीक्षा आता संपली आहे. नवीन वर्षातील पहिल्या तीन महिन्यांसाठी येत्या १ जानेवारी रोजी श्री विठ्ठल- रुक्मिणीच्या नित्य, तुळशीपूजा, नित्यपूजा आणि पाद्यपूजेसाठी ऑनलाइन बुकिंग सुरू केले जाणार आहे. भाविकांनी विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समितीच्या अधिकृत संकेतस्थळावरच ऑनलाइन बुकिंग करावे, असे आवाहन मंदिर समितीकडून करण्यात आले आहे. पूजेची नोंदणी करण्यासाठी आतापासूनच भाविक सज्ज झाले आहेत.




श्री विठ्ठल आणि रुक्मिणीच्या नित्य, तुळशी आणि पाद्यपूजेमध्ये पारदर्शकता आणि सुसूत्रता यावी यासाठी मंदिर समितीने प्रथमच ऑनलाइन बुकिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. तशी यंत्रणा देखील कार्यरत केली आहे. नव्या वर्षातील विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या सर्व पूजांचे बुकिंग हे ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. या नव्या संगणकीय प्रणालीमुळे वशिलेबाजीला चाप बसणार आहे. त्यामुळे भाविकांमधून देखील मंदिर समितीच्या या नव्या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >