मुंबई : शारदाश्रम विद्यामंदिर (Shardashram Vidyamandir) ही दादरमधील प्रख्यात शाळा यावर्षी अमृत महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. त्यानिमित्ताने शाळेत शुक्रवारी शाळेच्या भव्य पटांगणावर सादर झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात अनेक दिग्गज आणि सुप्रसिद्ध व्यक्तींनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे कौतुक केले. मराठी ही आपली मायबोली! महाराष्ट्रातील सण उत्सव आणि संस्कृती याचे प्रदर्शन विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमातून दाखविले. गणेश वंदनाने कार्यक्रम सुरू झाला.
Celebrity Master Chef Show : ‘सेलिब्रिटी मास्टर शेफ’ शो मध्ये दिसणार निक्की तांबोळींसह उषा नाडकर्णी
महाराष्ट्रातील संस्कृतीचे दर्शन घडवणारे कोळी नृत्य गोंधळ नृत्य धनगर नृत्य सण उत्सवांचे नृत्य शिवराज्याभिषेक असे अनेक नृत्याविष्कार विद्यार्थ्यांनी सादर केले. यामध्ये इयत्ता पहिली ते चौथीच्या एकूण ३५० मुलांनी सहभाग घेतला पालकांनी उत्तम सहकार्य केले. यात भर पडली ती पालकांनी सादरीकरण केलेल्या लाठीकाठी या नृत्याची विद्यार्थ्यांसोबत शारदाश्रम विद्यामंदिरचे पालक देखील प्रत्येक उपक्रमात उत्साहाने सहभागी होत असतात.
याप्रसंगी नवनीत प्रकाशन समूहाचे प्रमुख संचालक जे.के. संपत उपस्थित होते. स्वयंसिद्धा फाउंडेशनच्या श्रुती लाड, प्रहार वृत्तपत्राचे प्रतिनिधी शारदाश्रम विद्यामंदिरचे माजी विद्यार्थी ज्ञानेश सावंत, सुप्रसिद्ध मराठी कलाकार आकाश शिंदे, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक नाईक, महात्मा गांधी विद्यामंदिरचे माजी मुख्याध्यापक हेदुलकर या सर्व उपस्थितांचे स्वागत शारदाश्रम विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका दीप्ती इंदुलकर यांनी केले. शाळेचे संचालक गजेंद्र शेट्टी यांनी उपस्थितांचा तुळशीचे रोप देऊन सन्मान केला. प्रशासकीय अधिकारी वनजा मोहन उपस्थित होत्या.